शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेचे दुर्लक्ष : नाशिकवेस ते नायगाववेस व वाजे विद्यालय ते नवापूल रस्त्यांना डांबरीकरणाची प्रतीक्षा

By admin | Updated: January 22, 2015 00:33 IST

सिन्नर शहरातील रस्त्यांची दुरवस्था

सिन्नर : शहरातील रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले असून, वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहे. वर्दळीच्या रस्त्यांचे रखडलेले डांबरीकरण, गटारींवरील तुटलेले ढापे, पालिकेच्या जलवाहिन्यांवरील उघडे व्हॉल्व्ह, नळजोडण्यांसाठी रस्ता खोदल्याने पडलेले खड्डे यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.नाशिकवेस ते नायगाववेस या रस्त्याचे केवळ खडीकरण झालेले आहे. तथापि, पावसाळ्यात या रस्त्यावरील मुरुम वाहून गेल्याने मोठ्या प्रमाणात खडी उखडली गेली आहे. याठिकाणी भाजीबाजार भरत असल्याने नागरिकांची वर्दळ असते. खडी मोकळी झाल्याने दुचाक्या अडखळणे, घसरणे आदि प्रकार घडत आहे. या रस्त्याने मोठी वाहने जात असताना चाकाखालून दगड उडून नागरिकांना इजाही झाल्या आहेत. वाजे विद्यालय ते नवापूल रस्त्याचेही डांबरीकरण रखडल्याने दुरवस्था झाली आहे. सिन्नर बसस्थानकात उतरल्यानंतर शहरात जाण्यासाठी हा सोयीचा रस्ता असल्याने येथे नेहमी वर्दळ असते. उतार असलेल्या या रस्त्याच्या खडीकरणासाठी वापरलेला मुरुम केव्हाच खंगळून गेला आहे. खडी मोकळी झालेली असल्याने ज्येष्ठ नागरिक, बालके व दुचाकीस्वारांना या रस्त्याने प्रवास करणे कठीण ठरत आहे. बसस्थानकाजवळील नगरपालिकेच्या शॉपिंग सेंटर जवळील गटारीचा ढापा कायम उघडा असतो. फुले पुतळ्याजवळील वळणावरील गटारीचा ढापाही तुटलेला आहे. कामगारचौक, नाशिकवेस, क्रांतीचौक, भाजीगल्ली आदि ठिकाणींही गटारी व जलवाहिन्यांच्या व्हॉल्ववरील ढापे गायब झालेले आहेत. वावीवेशीत तर वाहन अडखळवणारा खड्डा ओलांडूनच शहरात प्रवेश करावा लागतो. याशिवाय मारुती मंदिर ते पडकीवेस, तानाजीचौक ते शिवाजीचौक, नवापूल ते शिवाजीचौक, शिंपीगल्ली ते लालचौक, नाशिकवेस ते लालचौक, वाजे विद्यालय ते भैरवनाथ मंदिर, शिवाजीचौक ते खडकपुरा, पोस्ट कार्यालय ते वावीवेस आदि रस्त्यांवरील कृत्रिम खड्ड्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ते अरुंद झाले असून, वाहतूक कोंडीस कारणीभूत ठरत आहे. (वार्ताहर)