शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

...तर जनक्षोभ उसळेल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:20 IST

उच्च न्यायालयाच्या नावाखाली पोलीस व महापालिका गणेश मंडळांची अडवणूक करून गणेशभक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. हिंदू सणांच्या बाबतीत केला जाणारा अतिरेक वेळीच थांबवा अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.

नाशिक : उच्च न्यायालयाच्या नावाखाली पोलीस व महापालिका गणेश मंडळांची अडवणूक करून गणेशभक्तांवर गुन्हे दाखल करीत आहे. हिंदू सणांच्या बाबतीत केला जाणारा अतिरेक वेळीच थांबवा अन्यथा जनक्षोभ उसळेल, असा इशारा शिवसेनेने जिल्हाधिकाºयांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.  सार्वजनिक गणेश मंडळांनी उभारलेले मंडप नियमांच्या आड दूर करण्याचे काम पोलीस व महापालिकेने सुरू केले असून, त्याबद्दल नाराज गणेशभक्तांना सोबत घेऊन शिवसेनेने मंगळवारी जिल्हाधिकाºयांना निवेदन सादर केले. त्यात म्हटले आहे की, गणेशोत्सवात सर्व जाती धर्माचे लोक सहभागी होऊन मोठ्या भक्तिभावाने उत्सव साजरे करीत असताना प्रशासनाने यंदा गणेशोत्सवावर जाचक अटी व शर्ती लागू केलेल्या आहेत. मनपा प्रशासनाने गणेशोत्सव मंडळाच्या जागेचे शुल्क मोठ्या प्रमाणावर वाढवलेले आहे व यानंतर जाचक अटी लादून उत्सव साजरा करण्यावर अडथला आणलेला आहे. तपासणी पथकाकडून मंडळांवर दबाव टाकून ध्वनिक्षेपक, मंडप काढण्यावर भर दिला जात आहे. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, विलास शिंदे, डी. जी. सूर्यवंशी, श्यामकुमार साबळे, संतोष गायकवाड, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, रमेश धोंगडे, पूनमताई मगर, प्रवीण तिदमे, प्रशांत दिवे, जयश्री खर्जल, नितीन चिडे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, शरद देवरे, शशिकांत कोठूळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.गुजरातमध्ये गरबा खेळण्यास परवानगी, महाराष्ट्रात मात्र उत्सव अडचणीतकायदेशीर कारवाईच्या धमक्या दिल्या जात असून, ध्वनिक्षेपकाचा आवाज ६५ डेसिबलपर्यंत मर्यादेत ठेवण्याची पद्धत चुकीची आहे. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक सण व उत्सवाच्या मागे वैज्ञानिक, धार्मिक व सामाजिक बांधिलकी असून, हिंदू सणांच्या बाबतीतच प्रशासनाकडून निर्बंध लादले जात आहेत. उत्तर प्रदेशात कावडी यात्रेच्या संदर्भात तेथील मुख्यमंत्र्यांनी सर्व निर्बंध गुंडाळून ठेवण्याचे आदेश दिले.गुजरातमध्ये गरबा खेळण्यासाठी पहाटे ४ वाजेपर्यंत ध्वनिक्षेपकाला परवानगी दिली जाते, परंतु महाराष्टÑात मात्र हिंदू सण व उत्सवच अडचणीत आणण्याचे काम प्रशासन मुद्दामहून करीत असून, प्रशासनाने नियमांचा बाऊ करून गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करू नये व निर्बंध तत्काळ शिथिल करावे अन्यथा जनक्षोभ निर्माण होऊन त्यास प्रशासन व सरकार जबादार राहील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.