शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार नाही तर, मग जबाबदार कोण ?

By admin | Updated: May 23, 2015 23:18 IST

मालाची परस्पर विक्री : असा झाला सुरगाणा धान्य घोटाळा

 नाशिक- धान्याच्या वितरणाबाबत जबाबदारी घेण्यात जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या तहसीलदारांनी हलगर्जीपणा दाखविला, हे सकृतदर्शनीच सरकारच्या ध्यानात आले होते. धान्याच्या लुटीमध्ये संबंधित तहसीलदारांचा सक्रीय सहभाग होता अथवा नाही, हे चौकशीअंती स्पष्ट होईलच. पण त्यांच्या हलगर्जीपणापायी घोटाळेबाजांना प्रोत्साहन मिळत गेले, हे निर्विवाद सत्य आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील शीधापत्रिकांची संख्या लक्षात घेऊन पुरवठा खात्याने तालुकानिहाय निर्धारित केलेला असतो. त्यानुसार मनमाडच्या धान्य गोदामातून रवाना झालेला नाशिक, दिंडोरी, कळवण, पेठ, सिन्नर, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर तालुक्यांचा धान्यसाठा परस्पर सुरगाणा तालुक्याकडे नेला गेला. तेथेही तो सरकारी गोदामात न जाता परस्पर खुल्या बाजारात विक्रीसाठी पाठविला गेला पण संबंधित सात तहसीलदारांना त्यांच्यासाठी धान्य रवाना झाल्याचे ठाऊक असूनही त्यांनी तो प्राप्त होतो किंवा नाही याची खबरदारी घेणे टाळले.  केवळ चार महिन्यांत तब्बल ५ कोटी २५ लाख रुपये किंमतीचे ३५० टन धान्य गायब झाले.वास्तविक जिल्हा पुरवठा कार्यालयाने प्रत्येक तालुक्यासाठी कोणत्या निकषांवर किती धान्यसाठा मंजूर करावा आणि त्यापैकी सर्व अथवा अंशत: केव्हां, कधी आणि कसा पाठवावा याची अत्यंत चोख आणि काटेकोर व्यवस्था सरकारनेच तयार करुन दिली आहे. त्यानुसार संबंधित तालुक्याच्या तहसीलदाराला मंजूर केलेला धान्यसाठा आणि त्यानंतर तो प्रत्यक्षात कधी रवाना होणार, हे लेखी स्वरुपात कळविले जाते. साहजिकच जिल्हा कार्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार संबंधित धान्यसाठा स्वीकारणे आणि लगेचच तसे जिल्हा कार्यालयास कळविणे, ही संबंधित तहसीलदाराची प्राथमिक जबाबदारी असते. मात्र जिल्ह्यातील सातही तालुक्यांच्या तहसीलदारांनी त्यात हलगर्जीपणा केला. हे सकृतदर्शनीच सरकारच्या ध्यानात आले. सप्टेंबर ते डिसेंबर २०१४ असे चार महिने चाललेली ही लूट जर डिसेंबर महिन्यातच लक्षात आली नसती तर कदाचित आणखीही काही काळ हा घोटाळा सुरूच राहिला असता.