शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री कडू यांनी माफी न मागितल्यास आत्मदहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:15 IST

नाशिक : आंतरधर्मीय विवाहाला पाठबळ पुरवून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एका पदाधिकाऱ्याचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले ...

नाशिक : आंतरधर्मीय विवाहाला पाठबळ पुरवून राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे समाजातील एका पदाधिकाऱ्याचे ह्दयविकाराच्या धक्क्याने निधन झाले आहे. तसेच संपूर्ण सुवर्णकार समाजात या घटनेने असंतोष पसरण्यासह समाजभावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या प्रकरणात राज्यमंत्री कडू यांनी समाजाची ३० जुलैच्या आत जाहीर माफी न मागितल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष गजू घोडके यांनी दिला आहे.

राज्यमंत्री कडू यांनी ‘कोण लग्न रोखतो ते मी पाहतो, मी लग्नात येऊन नाचणार’ असे आव्हान देऊन एकप्रकारे समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आता समाजाचे समाधान होईपर्यंत ही लढाई सुरूच राहणार असल्याचेही घोडके यांनी जाहीर केले. संपूर्ण समाजाला डावलून एकतर्फी निर्णय घेणे कितपत योग्य आहे, असा सवालदेखील घोडके यांनी केला आहे. आमचा लग्नाला विरोध नव्हता. मात्र, दिव्यांग कन्येशी लग्न करायला समाजातील कुणीच मुलगा नाही, हा मुलीच्या वडिलांचा दावा चुकीचा होता. त्यांनी चर्चा केली असती तर मुलीसाठी समाजातील शंभर मुले विवाहासाठी दाखवली असती. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यानंतर कडूंनी विनाकारणच प्रकरणात हस्तक्षेप केला. त्यामुळे राज्यभरातील समाजबांधवांनी काळ्या फिती लावून कडू यांचा निषेध करण्याचे आवाहनदेखील घोडके यांनी केले. तसेच दरम्यानच्या काळात आमदार कपिल पाटील यांनीदेखील मुलीच्या वडिलांची भेट घेऊन त्यांचे समर्थन केले. त्यामुळे आमदार पाटील यांनीदेखील समाजाची माफी मागावी, अशी मागणीही घोडके यांनी केली. आम्ही व्यापारी समाजातील माणसे आहोत. मात्र, समाजाविरुद्ध कुणी वक्तव्य करणार असतील, तर राज्यव्यापी बंद पुकारून आमची ताकद दाखवून देऊ, असा इशाराही घोडके यांनी दिला आहे.

फोटो

२६घोडके