शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

इमानाची शीटं बुक झाली तर..!

By admin | Updated: June 14, 2015 01:54 IST

इमानाची शीटं बुक झाली तर..!

संजय पाठक ल्ल नाशिकएष्टी धुवून पुसून अड्ड्यात तयार. ड्रायव्हर-कंडक्टरही तयार... पण पॅसेंजरचा पत्ताच नाही... मग काय तंबाखू मळीत पॅसेंजरची वाट बघायची... बराच वेळ गेला. एक प्रवासी आला. त्याला पाहून दुसरा आला आणि एष्टी आता हलणारच असं लक्षात आल्यावर हळूहळू आख्खी एष्टीच भरली... आता काय द्या डबल... एष्टी सुसाट... हे झालं एष्टीविषयी... पण विमानाचं काय... अरे इथं एक नाही, दोन नाही अगदी शेकडो विकासेच्छुक विमानासाठी व्याकूळ झालेले... विमानतळ बांधून झाले... पण विमानाचा पत्ताच नाही... आता विमान आले तर मग प्रवाशांचा पत्ता नाही... एकेक करीत म्हणे शीट भरली... पेपरात बातमी आली... ५० टक्के शीट भरली आणि आता शंभर टक्के फुल... साऱ्यांची उत्कंठा ताणली गेली प्रवासी किती... फक्त ९!तसा नाशिकचा विकास हा त्याच्या नैसर्गिक उपलब्धता आणि भौगोलिक स्थानामुळे होत असला तरी हा संथगती प्रवास अनेकांना मान्य नाही. जगात कसल्याची प्रोजेक्टची घोषणा होऊ द्या, तो नाशकात अन् नाशकातच झाला पाहिजे, ही त्यांची धारणा. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या स्थापनेपासून पुणे विद्यापीठाच्या विभाजनापर्यंत आणि बोर्इंगच्या प्रकल्पापासून हीरो होंडाच्या प्रकल्पापर्यंत... आयआयएमपासून योग विद्यापीठापर्यंत कसलीही घोषणा झाली की नाशिकच त्यासाठी कसं योग्य आहे, हे सांगण्याची स्पर्धाच सुरू होते. त्यातून फार काही पदरी पडलं आहे, असं दिसत नसल्यानेच बहुधा विकासोच्छुकांची भूक कमी झालेली नाही. बहुत परिश्रम केल्यानंतर संशोधनाअंती दळणवळणासाठी हवाई मार्गावर नाशिकचे नाव नसल्यानेच ही सारी समस्या निर्माण झाल्याचा निष्कर्ष विकासोच्छुकांनी काढला. त्यामुळेच टाटा-बिर्लापासून अंबानीपर्यंत आणि थेट बराक- बिलगेट्सपर्यंत नाशिकमध्ये येण्यास तयार नाही, असं मत झाल्याने नाशिकमध्ये विमानसेवा सुरू व्हावी, असा त्यांचा खासा आग्रह. पण हा निष्कर्ष काढणारे आणि विमानसेवा चालवणाऱ्या कंपन्यांचे गणित जमत नाही. विकास झाला तर (च) हवाईसेवा चालेल असं कंपनीवाल्यांचं म्हणणं, तर विमान आलं तरच विकास असं नाशिकच्या विकासोच्छुक संशोधकांचे मत. या गोंधळात आत्तापर्यंत नाशिकमधून तीनदा बुंग उडालं आणि खालीही उतरलं. परंतु विकासोच्छुक मंडळी ऐकायला तयार नाही. मध्यंतरी नाशिकमध्ये नागरी विमानसेवेसाठी स्वतंत्र ‘विमानतळ’च नाही, अशी एक आवई उठली. लष्कराच्या ताब्यातील परंतु मर्यादित वापरासाठी असलेला विमानतळ पुरेसा नाही, नवीन विमानतळ म्हणजे खरेतर केवळ टर्मिनल बिल्डिंगच हवी असा आग्रह धरण्यात आला. मग ज्यांना अशा मंडळींनी विकासपुरुष बिरुदावली दिली आहे, त्या नाशिकच्या तत्कालीन पालकमंत्र्यांनी हा हट्ट पूर्ण केला. विमानतळ बांधलं, पण विमानाचा पत्ताच नाही. अमुक कंपनी येणार, तमुकने सर्वेक्षण केले, अशा केवळ चर्चाच झाल्या; परंतु कोणीही कंपनी नाशिकचे नाव घ्यायला तयार नाही. मग जलाशयावरून आणि जमिनीवरूनही उड्डाण करू शकणाऱ्या सी प्लेन चालविणाऱ्या मेहेर कंपनीला बहुधा दया आली त्यांनी सध्या लग्न सोहळे आणि पार्ट्यांसाठीच मंगल कार्यालयात रुपांतरीत झालेल्या विमानतळावर एक तरी विमान उडू देण्याचा संकल्प केला. तो जाहीर झाल्यांनतर आता नाशिककरांच्या उड्याच पडणार, असा बहुधा विमानवाल्यांचा मानस असावा. परंतु नऊ सीट भरण्यासाठी आठवडा लागला. पहिल्या दिवशी सर्व्हिस लॉँच होणार. त्यासाठी काही हौशे मिळाले. (अर्थातच नाशिक-पुणे दरम्यान विमानसेवेच्या ५० अखेर इमानाचीशीटंबुक झाली तर..!मिनिटांसाठी सहा हजार रुपये मोजणारे हौशीच असणार ना!) दोन आमदारही गळाला लागलेत म्हणे. सोमवारी सकाळी शुुभारंभाच्या प्रयोगाचा प्रश्न मिटला असला, तरी पुढे काय? एकाच दिवसात आणखी तीन फेऱ्या होणे बाकी आहे. शिवाय विमान एक दिवस नाही, तर सलग चालवायचे आहे. त्यासाठी विकासोच्छुकांचा तितकाच हात हवा आहे, त्यामुळे खडतर मार्गापेक्षा खर्चिक प्रवास बरा, असे म्हणताना ‘मेहर’वर किती ‘मेहरबानी’ होते ते पहायचे. तोपर्यंत पहिल्या फेरीसाठी तरी शुभास्ते पंथाना. (प्रतिनिधी)