शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांपेक्षा वेगळ्या समीकरणांचा अंदाज

By admin | Updated: February 16, 2017 00:27 IST

नांदगाव : वेगवेगळ्या आधारांवर विजयाची आकडेमोड

 संजीव धामणे नांदगाव माघारीनंतर गट व गणात पक्ष पातळीवर तिरंगी लढती दिसून येत असल्या तरी काही ठिकाणी पक्ष पातळीपलीकडे जाऊन जातीची समीकरणे जोर धरु लागल्याने निकालोत्तर बलाबल कशाच्या आधारावर असेल, याची चिकित्सा राजकीय वर्तुळात केली जात आहे. पक्षातला निष्ठावान केवळ चादरी उचलण्यासाठीच असतो, जिंकण्याचे मेरिट त्याच्यात नसतेच. या समजामुळे आयात झालेले उमेदवार तिकीट मिळविण्यात यशस्वी होत असतात. इतरत्र आढळणारा हा प्रकार येथेही आहेच. शिवसेनेकडे यावेळी इतर पक्षांमधून आयात झालेल्या उमेदवारांची संख्या लक्षणीय आहे. भाजपाही त्याला अपवाद नाही. साकोरा गटात बाजार समितीमधील शिवसेनेचे विद्यमान संचालक दिलीप पगार भाजपाच्या तिकिटावर नशीब आजमावत आहेत. परवापर्यंत राष्ट्रवादीत असलेले भुजबळांचे निकटवर्ती विष्णू निकम यांच्या पत्नी सुमन निकम साकोरा गणात शिवसेनेच्या तिकिटावर उभ्या आहेत. याच गणात भाजपाने पूर्वाश्रमीचे शिवसैनिक दीपक म्हस्के यांच्या पत्नी ज्योती म्हस्के यांना उमेदवारी दिली आहे. तर न्यायडोंगरी गणातील शिवसेना पंचायत समिती सदस्य शशिकांत मोरे यांना काँग्रेसमधून आलेल्या विजया अहेर यांनी तिकिटाची धोबीपछाड दिल्याने मोरे यांनी पत्नी गायत्री मोरे यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवून आहेरांना शह दिला आहे. एकंदरित या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी या दोघा पक्षांची पडझड झाली. काँग्रेस व राष्ट्रवादीतून निर्यात झालेल्या इच्छुकांमुळे शिवसेना व भाजपा या पक्षांमध्ये गर्दी झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये. पानेवाडी गणात धर्मनिरपेक्ष विचारसरणीचे गंगाधर बिडगर शिवसेनेच्या तिकिटावर उभे आहेत. शिवसेनेचे दशरथ लहिरे यांच्या पत्नी प्रतिभा लहिरे यांना तिकीट मिळविण्यात यश मिळाले. राष्ट्रवादीच्या साकोरा गटातील विद्यमान सदस्य माधुरी बोरसे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी राष्ट्रवादीविरोधात बंडाचे निशाण फडकावत साकोरे गणातून अपक्ष उमेदवारी केली आहे. साकोरा, मांडवड, न्यायडोंगरी, जातेगाव या मोठ्या गावांमधून निवडणुकीत गावाचा अभिमान हा मुद्दा आहे. एकंदरित पक्षांनी गट व गणांत उमेदवार देताना जातीय समीकरणे समोर ठेवून उमेदवार दिले असले व त्यामधून पक्षीय यशाची स्वप्ने बघितली असली तरी अंतर्गत प्रवाह वेगळ्या दिशेने वाहू लागले आहेत. माधुरी बोरसे यांची अपक्ष उमेदवारी या प्रवाहांचे एक मासलेवाईक उदाहरण आहे. पक्षीय गणितांवर जातीय समीकरणांनी मात केली तर अनपेक्षित निकाल लागण्याची शक्यता आहे.