लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गोड गुलाबी थंडीत बाहेर पडून मिसळीचा आस्वाद गत दोन महिन्यांत अनेकांनी घेतला असेल. पण ताजा हुरडा आणि मिसळीच्या या अनोख्या पार्टीचा आस्वाद घेण्याची कल्पनाच खूप अनोखी आणि चवदार आहे. लोकमत सखी मंच सदस्यांसह अन्य महिला वर्गासाठी या चटकदार मेजवानीची संधी दि. ५ फेब्रुवारीला उपलब्ध करून देण्यात आली आहे.
नवीन वर्षात सर्व मैत्रिणींसह धम्माल करण्याची ही संधी सखींना मिळणार आहे. सुला वाईनयार्डसमोरील साधना व्हीलेजमध्ये या बहारदार पार्टीचे आयोजन केले जाणार आहे. सर्व सखी मंच सदस्यांसाठी प्रत्येकी ३५० रुपये, तर अन्य महिलांसाठी ४९० रुपये असे शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कामध्ये अस्सल गावरान हुरडा, साधना चुलीवरची मिसळ यांसह लोकमत शहर कार्यालयापासून बस प्रवास या सर्व बाबींचा समावेश आहे. तसेच गोडीशेव, रेवडी, दही, चटण्या, बोरांची लज्जत चाखतानाच हौजी हंगामा आणि बैलगाडी सफारीचाही आनंद लुटता येणार आहे. त्याशिवाय विविध खेळांमध्ये आकर्षक बक्षिसे जिंकण्याचीही संधी मिळू शकणार आहे. दि. ५ फेब्रुवारीला सकाळी ९.३० वाजता शहर कार्यालयापासून बस रवाना होणार आहे.
इन्फो
थोड्याच जागा शिल्लक
नवीन वर्षातील ही अनोखी संधी मिळविण्यासाठी सखींचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे आता थोड्याच जागा शिल्लक असून, इच्छुकांना त्वरित संपर्क साधावा लागणार आहे. नोंदणी ही लोकमत शहर कार्यालय आणि अंबड कार्यालयात सकाळी १० ते ५ या वेळेत करता येणार आहे. सखी मंच सदस्यांसाठी २०२०चे कार्ड समवेत ठेवणे आवश्यक असून, प्रत्येकासाठी मास्क बंधनकारक आहे.
लोगो
लोकमत सखी मंच लोगो वापरावा. मंगळवारी प्रसिद्धी अत्यावश्यक.