शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारासाठी शोधाशोध

By admin | Updated: May 9, 2016 23:52 IST

पाडळी : पाताळेश्वर विद्यालयाची विद्यार्थ्यांसाठी मोहीम

 सिन्नर : गावांपेक्षा वाड्या-वस्त्यांवर दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याची बाब लक्षात घेऊन सिन्नर तालुक्यातल्या पाडळी येथील पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या वतीने मोहीम आखली आहे. त्याअंतर्गत पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या वाड्या-वस्त्यांवरील मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत आणून पोषण आहार दिला जात आहे. पाताळेश्वर विद्यालयाची विद्यार्थिनी राधा विठ्ठल गावंडे ही विद्यार्थिनी सावरगाव पाट ते टोळेवस्ती हे डोंगर पायथ्याचे तीन किलोमीटर अंतर दररोज कापून पिण्याचे पाणी मिळवण्यासाठी पायपीट करत असल्याची बाब शिक्षकांना समजली होती. तहान भागविण्यासाठी शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी होणारी ही ससेहोलपट दुष्काळाची दाहकता व पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवणारी ठरली. मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सविता देशमुख, टी. के. रेवगडे, कैलास गांगुर्डे, एम. सी. शिंगोटे या शिक्षकांनी वाड्या-वस्त्यांवर जाऊन १ ते १४ वर्षे वयोगटातील मुलांचा शोध घेत त्यांना शाळेत आणून शालेय पोषण आहार देण्याची मोहीम सुरू केली आहे. वाड्या-वस्त्यांवरील व आदिवासी मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, बालसंस्कार केंद्र राबवणे, बाल मजुरीचे प्रमाण थांबवणे आदि उपक्रम विद्यालयाच्या वतीने राबविण्यात येत आहे. (वार्ताहर)