शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

शेकडो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By admin | Updated: October 1, 2016 00:07 IST

कळवण : वसतिगृहात प्रवेश न मिळाल्याने राज्यपालांचे लक्ष वेधले

कळवण : यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून शेकडो विद्यार्थी कळवण शहरातून व तालुक्यातून माघारी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रता असूनही शेकडो आदिवासी विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित झाले आहेत. वसतिगृहाची सोय करावी अशी मागणी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींसह जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी राज्यपाल सी. विद्यासागर राव, राज्याचे आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा, विधिमंडळ अनुसूचित जाती- जमाती समितीचे अध्यक्ष आमदार रुपेश म्हात्रे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.कळवण, मानूर, अभोणा, कनाशी, दळवट, नाकोडे तसेच सुरगाणा, बोरगाव, देवळा, डांगसौंदाणे आदि कळवण प्रकल्पांतर्गत येत असलेल्या निरनिराळ्या शासकीय अनुदानित, विनाअनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालयांमध्ये तसेच इतर शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे आहेत. यंदाच्या शैक्षणिक वर्षात निरनिराळ्या शैक्षणिक शाखांना प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांपैकी ९८७ विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत. वसतिगृहासाठी ३२८० विद्यार्थिसंख्या मंजूर असून, ३३१५ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज प्रलंबित असून, १२५० वाढीव प्रवेशाची मागणी शासनस्तरावर करण्यात आली असल्याची माहिती प्रकल्प कार्यालयातील सूत्रांनी दिली आहे. ९८७ विद्यार्थ्यांचे वसतिगृह प्रवेश अर्ज शासनस्तरावर खास बाब म्हणून मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहेत, तर वसतिगृहाची सोय झाली नाही म्हणून अनेक विद्यार्थी घराकडे परतले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पात्रता असूनही हे विद्यार्थी केवळ राहण्याची व्यवस्था नसल्याने शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. या प्रवेशासंबंधी गेल्या ३ ते ४ वर्षांपासून कळवण येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात आंदोलन, मोर्चा तसेच टाळेबंदी आंदोलने झाली. पण त्याचा फारसा उपयोग झाला नाही. राज्यपालांना यासंदर्भात निवेदन देण्यात येऊन लक्ष वेधून घेतल्यानंतर शासनस्तरावरून व मंत्रालयातून खास बाब म्हणून आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना वसतिगृहात प्रवेश मिळवून देण्यासाठी जयश्री पवार यांना मागील काळात यश आले होते. (वार्ताहर)कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्याची मागणीआदिवासी शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळावा म्हणून कळवण प्रकल्पांतर्गत असलेल्या सात तालुक्यांतील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक नाशिक, कळवण येथील अधिकाऱ्यांच्या दारात जाऊन प्रवेशाची याचना करीत आहेत. कळवण तालुक्यातील शासकीय वसतिगृहांचा उपयोग तालुक्यातील विद्यार्थ्यांना होणार नसेल तर त्यांचा काय उपयोग? माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय सुरू होऊन चार महिने झाले असून, काही पाठ्यक्र माच्या विद्यार्थ्यांची पहिल्या सत्राची परीक्षेची तारीखदेखील जाहीर झाली आहे. कळवण तालुक्यातील विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश देताना प्राधान्य दिले जावे, अशी मागणी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक करीत असताना प्रकल्प कार्यालयातील जबाबदार अधिकारी ‘आम्ही तुम्हाला कुठलीही मदत करू शकत नाही, तुम्हाला पटेल ते करा’ अशी बेजबाबदार वक्तव्ये करीत मंत्रालयातून आदेश येईल तेव्हा प्रवेश मिळेल, अशी उत्तरे आदिवासी पालकांना दिली जात आहेत.मागील चार महिन्यांपासून आदिवासी विद्यार्थ्यांचा वसतिगृह प्रवेशासंबंधीचा घोळ सुरूच असून, कळवण तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांना दररोज पदरखर्च करून शिक्षण घ्यावे लागत असून, शासनाच्या आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींना असलेल्या सवलतीचा फायदा होत नसल्याने आदिवासी बांधवांमध्ये नाराजीचा सूर आहे. - डी. एम. गायकवाड, अध्यक्ष, आदिवासी संघर्ष समिती, कळवण