शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
4
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
5
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
6
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
7
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
8
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
9
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
10
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
11
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
12
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
13
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
14
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
15
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
16
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
17
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
18
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
19
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
20
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
Daily Top 2Weekly Top 5

शंभर फुटी रस्ता होणार हगणदारी

By admin | Updated: May 26, 2016 22:27 IST

मुक्तस्वच्छ भारत अभियान : राजीवनगर झोपडपट्टीत शौचालय उभारणी

 संजय शहाणे  इंदिरानगरराजीवनगर झोपडपट्टीलगतच्या शंभर फुटी रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नाक दाबूनच पुढे जायचे, हा अनुभव तेथून जाणाऱ्या प्रत्येकाचाच. रस्त्याच्या दुतर्फा झोपडपट्टीतील रहिवाशांनी हगणदारीच बनवल्याने दुर्गंधीचा त्रास सहन करण्यापलीकडचा. मात्र, आता हा शंभर फुटी रस्ता लवकरच हगणदारीमुक्त होणार असून, स्वच्छ भारत अभियानांतर्गत राजीवनगर झोपडपट्टीतील रहिवाशांनी शौचालय उभारणीला प्रतिसाद दिला आहे.पहिल्या टप्प्यात सुमारे १५० रहिवाशांना शौचालय उभारणीसाठी अनुदान देण्यात आले आहे, तर सर्वच्या सर्व ७५० झोपडीधारकांनाही या अभियानात सामील करून घेतले जाणार आहे.गेल्या अनेक वर्षांपासून झोपडपट्टीतील रहिवासी शौचविधीसाठी परिसरातील मोकळ्या भूखंडाचा वापर करत होते. परंतु भूखंडमालकाने संरक्षण भिंत बांधून जागा बंदिस्त केल्याने रहिवाशांची अडचण झाली. त्यामुळे रहिवाशांनी आपला मोर्चा रस्त्याकडे वळविला. शौचविधीसाठी शंभर फुटी रस्त्याच्या दुतर्फा जागेचा सर्रास वापर होऊ लागला. रहिवाशांचा शौचालयाचा प्रश्न सोडविण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले; परंतु त्यात यश येत नव्हते. दरम्यान, केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय उभारणीचा कार्यक्रम महापालिकेने हाती घेतला आणि स्थानिक नगरसेवक सतीश सोनवणे यांनी राजीवनगर झोपडपट्टी परिसर हगणदारीमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला. पहिल्या टप्प्यात सुमारे १५० रहिवाशांकडून आवश्यक ती कागदपत्रे घेत त्यांना शौचालय उभारण्यासाठी ६ हजार रुपयांचा पहिला हप्ता अदा करण्यात आला. आता सदर रहिवाशांनी शौचालय बांधण्याचे काम हाती घेतले असून, त्याच्या पूर्णत्वानंतर त्यांना पुढचा ६ हजारांचा हप्ता दिला जाणार आहे. उर्वरित झोपडीधारकांनाही शौचालय उभारणीसाठी प्रवृत्त केले जात असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.