गेल्या तीन महिन्यांपासून महारुद्र कॉलनी, अरुणोदय सोसायटी, मानस कॉलनी, देवदत्त सोसायटी, जिल्हा परिषद कॉलनी, मोदकेश्वर कॉलनी, सिद्धिविनायक सोसायटी, आत्मविश्वास सोसायटी, देवेंद्र कॉलनीसह परिसरात वीज देयके वाटप होत नाहीत. त्यामुळे नागरिकांना दर महिन्याला येणारे वीज देयक किती आले याची माहिती होत नाही. त्यामुळे वीज देयके भरता येत नसल्याने पुढच्या महिन्यात त्यात वाढ होऊन येत आहे. व्यावसायिकांना देयक भरण्याचे वेळेचे बंधन असल्याने आणि काही नागरिकांचे लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेले असल्याने त्यांनी वीज देयके कशी भरायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरण कंपनीच्या ठेकेदाराने दर महिन्याला वीज देयक वाटप करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
वीज देयके मिळत नसल्याने भरायची कशी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:19 IST