शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

आडगावला कौलारू घरे पेटली : आग आटोक्यात

By admin | Updated: April 16, 2017 14:36 IST

मते गल्लीतील दगडोबा मंदीराजवळ असलेल्या कौलारू घरांच्या चाळीला आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

नाशिक : येथील आडगावमध्ये असलेल्या मते गल्लीतील दगडोबा मंदीराजवळ असलेल्या कौलारू घरांच्या चाळीला आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या वाड्यात  सर्व रहिवासी सुरक्षित असल्याची माहिती अग्निशामक दलाने दिली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक विभागीय कार्यालय, कोणार्क नगर येथील पंचवटी विभागीय अग्निशामक केंद्राचा बंब प्रथम रवाना झाला. अवघ्या पाच मिनिटांत बंब घटनास्थळी पोहचल्याने आग विझविण्याच्या कार्याला जलद सुरूवात झाली. त्यानंतर शिंगाडा तलाव मुख्यालयाचा एक बंब व पंचवटी उपकेंद्रावरील दोन बंब असे एकूण चार बंब घटनास्थळी पोहचले आहे. वाऱ्याचा वेग अधिक असल्यामुळे आणि वाडा कौलारू असल्याने आगीने रौद्रावतार धारण केला होता.

आग विझविण्याचे कार्य जलदगतीने सुरू असून आग आटोक्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मुख्यालयातील लिडिंग फायरमन इकबाल शेख, शिवाजी फुगट, इस्हाक शेख, दिनेश लासूरे, जयंत्र सांत्रस, सुनील घुगे, उमेश झिटे, विजू गायकवाड, संजय गाडेकर, संतोष मेंद्रे आदि जवान आग विझविण्याचे कार्य करत आहेत. आग आटोक्यात आली आहे. चार बंब घटनास्थळी पोहचले असून महाजन यांच्या घरात प्रथमत: गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन आग लागल्याची परिसरात चर्चा आहे. एकमेकांना आठ ते दहा घरे लागून असून सर्व घरे जुन्या पध्दतीची कौलारू असल्यामुळे तत्काळ आगीने भीषण रूप धारण केले.