शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

शाळांची घरपट्टी माफ कागदावरच

By admin | Updated: December 3, 2014 23:56 IST

मराठी शाळांना पालिकेकडून नोटिसा : संस्थाचालक न्यायालयात जाण्याच्या तयारीत

नाशिक : मराठी कार्ड खेळणाऱ्या मनसेने विधानसभा निवडणुकीपूर्वी आर्थिक ओढग्रस्त असलेल्या मराठी शाळांना घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला खरा; परंतु प्रशासनाने त्याची अंमलबजावणीच केलेली नाही. उलट घरपट्टी थकल्याने मराठी शाळांना पालिकेने नोटिसा पाठविल्या आहेत. त्यामुळे त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे.नाशिक शहरातील मराठी शाळांची अवस्था बिकट आहे. दिवसेंदिवस खर्चात वाढ होत असताना, उत्पन्न मात्र त्या तुलनेत मिळत नाही. अनुदानित शाळांची तर अधिक बिकट अवस्था असून, २००४ पासून शासनाने वेतनेतर अनुदान न दिल्याने कोट्यवधी रुपयांची थकबाकी शासनाकडे आहे. या अनुदानाअभावी शाळांना वीज देयके भरणे कठीण झाले आहे. घरपट्टीदेखील भरता येत नाही. अशा स्थितीत मराठी शाळा चालवायच्या कशा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी मनसेचे नगरसेवक सुदाम कोंबडे यांनी शहरातील सर्व मराठी शाळांना घरपट्टी माफ करण्याचा अशासकीय प्रस्ताव मांडला, तो मंजूर झाला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या महापालिकेच्या अंदाजपत्रकीय महासभेत तत्कालीन महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांनीदेखील मराठी शाळांना घरपट्टी शंभर टक्के माफ करण्याची घोषणा केली. त्यामुळे मराठी शाळांना दिलासा मिळेल असे वाटत होते; परंतु त्याचा उपयोग झाला नाही. कारण आता पालिकेने घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू केल्यानंतर सर्व शाळांना नोटिसा बजावल्या आहेत. आधीच आर्थिक ओढाताण होत असताना, आता कारवाईचा बडगा पालिकेने उगारल्याने मराठी शिक्षणसंस्थाचालकांची अवस्था बिकट झाली आहे. काही संस्थांनी निमूटपणे कर भरण्याची तयारी केली आहे. काही संस्थांनी मात्र पालिकेच्या ठरावाची अंमलबजावणी होत नसल्याने राज ठाकरे यांची भेट घेण्याची तयारी केली आहे. (प्रतिनिधी)