बागलाण तालुक्यात सोमवारी पहाटे झालेल्या वादळी पावसामुळे पश्चिम आदिवासी पट्ट्यातील बोरदैवत, मालेअंबा, कांद्याचामळा, हणमंतपाडा, जामनेस पाडा, भीमखेत, वाघंबे, मानूर, टाकळीपाडा आदी भागांत दोन तास वादळी पाऊस झाला. वादळामुळे बहुतांश घरांचे पत्रे आणि कौले उडाल्याने नुकसान झाले, तर काही घरांच्या भिंती कोसळल्याने आदिवासी बांधवांचा संसार उघड्यावर पडला. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे २५ ते ३० घरांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, आमदार दिलीप बोरसे यांनी नुकसानग्रस्त घरांचा पंचनामा करण्याच्या सूचना तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांना दिल्या आहेत. त्यानुसार तहसीलदारांनी तलाठी व ग्रामसेवक यांना तातडीने नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. तीन दिवसांत तसा अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
फोटो - १७ मानूर रेन
मानूर येथील संजय गवळी यांच्या घराचे वादळामुळे कौले उडाल्याने झालेले नुकसान.
===Photopath===
170521\17nsk_35_17052021_13.jpg
===Caption===
फोटो - १७ मानूर रेन मानूर येथील संजय गवळी यांच्या घराचे वादळामुळे कौले उडाल्याने झालेले नुकसान.