शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी येवला तहसील कार्यालयात तासभर ठिय्या

By admin | Updated: June 8, 2016 22:33 IST

दखल : दोन दिवसात प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन

 

येवला : कानडी गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत असल्याच्या पार्श्वभूमीवर पाटोदा शिवारात असलेली कानडी ग्रामपंचायतीची विहीर खोलीकरण करण्यासाठी होणाऱ्या पाटोदा गावच्या काही ग्रामस्थांनी केलेल्या विरोधात प्रशासनाने हस्तक्षेप करून विहीर खोलीकरणाचा मार्ग मोकळा करावा, असा आग्रह कानडी गावच्या महिलांनी धरला आणि तहसील आवारात ५५ महिलांनी आपल्या हंड्यांसह सुमारे तासभर ठिय्या मांडला. हंडा नाद केल्याने संपूर्ण तहसील आवाराचे लक्ष या महिलांनी वेधून घेतले होते. आम्हाला टॅँकरचे पाणी पुरत नाही. आमच्या हक्काच्या विहिरीचे खोलीकरण करू द्या, अशी मागणी करीत थेट तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याशी चर्चा केली आणि निवेदनही दिले. आम्ही २४ किलोमीटरवरून आलो, आमचा प्रश्न सोडवा, अशी आग्रही भूमिका महिलांनी घेतली. दरम्यान, या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तहसीलदार शरद मंडलिक व गटविकास अधिकारी सुनील आहिरे हे दोन दिवसात कानडी गावचा पाणीपुरवठा करणाऱ्या या विहिरीची प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन महिलांना मिळाल्याने प्रश्न मार्गी लागणार या आशेने त्या महिला परतल्या.येवला पंचायत समितीच्या वतीने कानडी गावाला टँँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी पाण्याची तहान भागात नाही, असे कानडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. शोभा उशीर, रेखा हारपडे, पुष्पा दौंड, अलका हिरे, चांगुणा काळे, पुष्पा होल्गर, राधिका डमाळे, चंद्रकला खुरचणे, चंद्रकला झेंडे, सुनीता झेंडे, पर्वताबाई बोडके, आशा खुरचणे, निर्मला काळे, चंद्रकांत जाधव, दत्तात्रय अहेर, परसराम गुंजाळ, मोहन काळे, योगेश हारपडे, संजय काळे, रवींद्र उशीर, सुभाष काळे यांच्यासह महिलांनी चर्चेत भाग घेत आपली व्यथा मांडली. (वार्ताहर)