शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

कामवाटप समितीचे ‘वराती मागून घोडे’

By admin | Updated: March 10, 2017 01:40 IST

नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीचे अनेक अजब किस्से आजवर उघड झालेले असताना आता तर कामवाटप समितीच्या कारभाराचा अजब नमुनाच उघड झाला आहे

 नाशिक : जिल्हा परिषदेच्या कामवाटप समितीचे अनेक अजब किस्से आजवर उघड झालेले असताना आता तर कामवाटप समितीच्या कारभाराचा अजब नमुनाच उघड झाला आहे. येत्या १५ मार्च रोजी होणाऱ्या काम वाटप समितीच्या बैठकीचे पत्र संबंधित कार्यकारी अभियंता यांना चक्क १५ मार्चची तारीख टाकूनच ९ मार्चला देण्यात आले आहे.विशेष म्हणजे काम वाटप समितीचे अध्यक्ष तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची कामवाटप समितीच्या बैठकीविषयी ठरविलेल्या तारखेची मंजूर टिपणीचा उल्लेखही कार्यकारी अभियंत्यांना दिलेल्या पत्रात नसल्याने खरोखर अशी काही बैठक झाली काय, याबाबत आता संशय निर्माण झाला आहे.कामांचे नियोजन तातडीने होण्याच्या दृष्टीने मार्च महिन्याची कामवाटप बैठक १५ मार्च २०१७ ला सकाळी ११ वाजता कार्यकारी अभियंता एकच्या दालनात आयोजित करण्यात आल्याबाबतचे पत्र बांधकाम विभागाच्या तीनही, लघुपाटबंधारे विभागाच्या दोन आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या एका कार्यकारी अभियंत्याला १५ मार्च २०१७ च्या तारखेचे पाठविण्यात आलेले आहे. १५ मार्चला कामवाटप समितीची बैठक असताना चक्क १५ मार्चच्या तारखेचेच पत्र कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आलेले आहे. या पत्रात म्हटले आहे की, तसेच ज्या बांधकाम व लघुपाटबंधारे विभागास नियमित कामवाटप समितीनंतर अतिरिक्त कामवाटप समितीची बैठक घेऊन कामे वाटप करावयाची असल्यास त्यांनी बांधकाम विभाग एककडे कामांची यादी पाठवावी, त्यानंतर कामवाटप समितीची बैठक लावण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. हे पत्र देतांना त्याबाबत कामवाटप समितीच्या अध्यक्षांच्या बैठकीचा जो संदर्भ देण्यात आला आहे त्या मंजूर टिपणीची तारीखही नाही. त्यामुळे या पत्राबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे.(प्रतिनिधी)