शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रध्वजाचा सन्मान यातच आपली शान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:27 IST

नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने फडकवला जाणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : स्वतंत्र भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला स्विकृती मिळून २२ जुलैला ७० वर्ष पूर्ण होत असून येत्या १५ आॅगस्टला देशभरात स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर हा राष्ट्रीय ध्वज मानाने आणि स्वाभीमाने फडकवला जाणार आहे. डौलाने फडकणाऱ्या आपल्या राष्ट्रीय ध्वजाचा सन्मान यातच आपली शान असल्यामुळे सर्वांनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखावा, असे आवाहन आवाहन विविध सोशल माध्यमांसह वेगवेगळ्या सेवाभावी संस्थांकडून केले जात आहे.  राष्ट्रध्वजाचे रक्षण करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. तसेच त्याचा यथोचित सन्मान होणेही आवश्यक आहे. म्हणून प्लॅस्टिकपासून तयार झालेले ध्वज वापरु नये. त्यांचा कागदी ध्वजाप्रमाणे पुननिर्मितीसाठी वापर होत नाही, त्यामुळे राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा प्रश्न उद््भवतो. भारतीय राष्ट्रध्वजाच्या संदर्भात भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची जी राष्ट्रध्वज नियमावली आहे तिचे पालन करावे. राष्ट्रध्वजाचा उचित सन्मान राखण्यासाठी भारतीय ध्वजसंहितेच्या (फ्लॅग कोड आॅफ इंडिया) कलम १.२ ते १, ५ मध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबतच्या तरतूदीनुसार राष्ट्रध्वज वापरावा.  प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वज वापराबाबत ध्वजसंहितेमध्ये काहीही नमूद नाही. त्याचा विचार करता कोणीही प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वज वापरु नये. राष्ट्रध्वजाचा अपमान तथा अवमान हा दंडनीय गुन्हा असून राष्ट्रीय सन्मानाचा अवमान प्रतिबंधक कायदा, १९७१ नुसार शिक्षेस पात्र आहे.राष्ट्रध्वजाचा सन्मानभारतीय राष्ट्रध्वज हा आपला राष्ट्रीय अभिमान व सार्वभौमत्वाचा संकेत आहे. राष्ट्रध्वज देशातील नागरिकांच्या इच्छा, आकांक्षा व अपेक्षांचे प्रतिक आहे. राष्ट्रध्वजाबाबत असलेल्या २००२ च्या नियमानुसार सामान्य नागरिक, खाजगी संस्था, शैक्षणिक संस्था आदिंनी संथांनी राष्ट्रध्वज फडकविण्यास कुठलेही बंधन नाही. केवळ राष्ट्रध्वज फडकविताना पुढील मार्गदर्शक तत्वानुसार राष्ट्रध्वजाचा सन्मान राखणे आवश्यक आहे.राष्ट्रध्वज फडकविण्याबाबत तसेच राष्ट्रध्वज नियमावलीबाबत अधिक माहिती ँ३३स्र://ेँं.ल्ल्रू.्रल्ल/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.योग्य कार्यवाही व्हावी१५ आॅगस्ट व २६ जानेवारी रोजी मुख्य शासकीय ध्वजारोहन कार्यक्र म तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्र मादरम्यान विद्यार्थी व नागरिकांकडून राष्ट्रध्वजाचा वापर करण्यात येतो. त्यानंतर खराब झालेले, माती लागलेले राष्ट्रध्वज मैदानात, रस्त्यावर तसेच कार्यक्र माच्या ठिकाणी इतरस्त: पडलेले राष्ट्रध्वज गोळा करून ते तालुका व जिल्हा स्तरावर निर्माण करण्यात आलेल्या यंत्रणेस सुपूर्द करण्याचे अधिकार अशासकीय संस्था तसेच इतर संघटनांना देण्यात आले आहेत त्यानुसार त्यांनी कार्यवाही करावी.