शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

आॅटोचालकाची बसचालकास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2018 23:16 IST

आगारातून नागपूरकडे जाणाऱ्या बसच्या मार्गावर उभी असलेली आॅटोरिक्षा हटविण्याचे सांगताच आॅटोरिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ व मारहाण केली.

ठळक मुद्देशेकडो प्रवासी अडकले : आगार दोन तास बंद; विद्यार्थी, रुग्ण, कर्मचाऱ्यांना फटका

आॅनलाईन लोकमतपरतवाडा : आगारातून नागपूरकडे जाणाऱ्या बसच्या मार्गावर उभी असलेली आॅटोरिक्षा हटविण्याचे सांगताच आॅटोरिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ व मारहाण केली. परतवाडा आगारापुढे शुक्रवारी सकाळी ९ वाजता ही घटना घडली. यानंतर आरोपींच्या अटकेची मागणी करीत एसटी चालकांनी तब्बल दोन तास बस आगारात उभ्या ठेवल्या. विद्यार्थी, रुग्ण, कर्मचाºयांसह सर्वसामान्य नागरिकांना हा वेळ ताटकळत काढावा लागला.संतोष हिरालाल खोलापुरे (४९, रा. जुना सराफा, अचलपूर) असे आरोपी आॅटोरिक्षाचालकाचे नाव आहे. सूरज आखेडे (३१, रा. जळकापूर) असे फिर्यादी बसचालकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी ९ वाजता एमएच ४० वाय ५९३८ क्रमांकाची परतवाडा-मोर्शी-नागपूर बसफेरी आगाराबाहेर काढत असताना सदर आॅटोरिक्षा रस्त्यात उभा होता. ती बाजूला घेण्यास सांगताच आॅटोरिक्षाचालक संतोष खालापुरे याने हुज्जत घातली आणि शिवीगाळ, ओढाताण करीत मारहाण केली. तशी फिर्याद परतवाडा पोलिसांत दाखल करण्यात आली. आरोपीविरुद्ध भादंविच्या ३५३, ३२३, १८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चक्काजाम आंदोलनचालक सूरज उतखेडे यांना मारहाण झाल्याचे माहिती होताच, आरोपीला अटक होईस्तोवर एकही बस जागेवरून हलविणार नसल्याचे चालकांनी जाहीर केले. तब्बल दोन तास शेकडो प्रवाशांसह शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी, रुग्ण, कर्मचारी ताटकळत राहिले. नगरपालिका उपाध्यक्ष शशिकांत जैस्वाल, नीलेश सातपुते, बंडू घोम, अनिल पिंपळे यांनी पळून गेलेल्या आरोपींसोबत संवाद साधून परतवाडा पोलिसांत नेले. त्यानंतरच चालकांनी बस आगाराबाहेर काढल्या.शहराची वाहतूक व्यवस्था पूर्णत: ढासळली असल्याचे चित्र असताना येथील वाहतूक शाखा बंदचा फटका आता सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे. आगारापुढे आॅटोचालकांची दादागिरी दररोजची झाली असून, यातून मोठा संघर्ष होण्याची शक्यता अनेक चालकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.शिवीगाळ व मारहाण केल्याची फिर्याद बसचालकाने दिली. त्यावरून आरोपीस अटक करण्यात आली. यानंतर वाहतूक सुरळीत झाली.- पी.डी. तळी, सहायक पोलीस निरीक्षक