शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांच्या घसरण्यामुळे महामार्ग वाहतुकीसाठी बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:19 IST

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग ...

नाशिक शहरातून जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर सर्वांत लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात आला असला तरी, शहरांतर्गत वाहतुकीसाठी वाहनचालकांना पुलाखालील राष्ट्रीय महामार्ग व समांतर रस्त्याशिवाय पर्याय नाही, परिणामी या रस्त्यावरील वर्दळ कायम आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडला की, रस्ता वाहन चालविण्यासाठी धोकेेदायक ठरू लागला असून, गेल्या आठवड्यात पंचवटीतील आडगाव नाका, दंत महाविद्यालय या भागात चिखल व पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहने घसरण्याची घटना घडल्याने अपघात टाळण्यासाठी महामार्ग प्राधिकरणाने अग्निशामक बंबाच्या साहाय्याने सदरचा रस्ता धुवून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो अल्पकाळ ठरला. गेल्या दोन दिवसांपासून पुन्हा पाऊस सुरू झाल्याने उड्डाणपुलाखाली ज्याठिकाणी पावसाच्या पाण्याने रस्ता धुतला जातो त्याठिकाणी हा प्रकार घडत नाही, मात्र ज्या ठिकाणी पाणी पडत नाही, अशा ठिकाणी वाहन घसरण्याचे प्रमाण वाढले आहे. पुलाखाली व आजूबाजूला असलेल्या शोभिवंत झाडांची माती पावसामुळे रस्त्यावर वाहून येत असल्यामुळेदेखील हा प्रकार सुरू असल्याचे महामार्ग प्राधिकरणाचे म्हणणे आहे. त्यामुळे पंचवटीतील स्वामी नारायण चौकीसमोर उड्डाण पुलाखालील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करून समांतर जोड रस्त्याने वाहतूक वळविली. त्याच प्रमाणे द्वारका चौकाच्या पुढे वडाळानाका चौफुलीवरून रस्ता बॅरिकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे. मुंबई नाक्याकडून इंदिरानगरकडे जातांनादेखील हाच प्रकार घडत असल्याने तेथेही बुधवारी रात्रीपासून रस्ता बंद करून समांतर रस्त्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

महामार्ग वाहतुकीसाठी बंद केल्यामुळे समांतर रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यातल्या त्यात मुंबई नाका, द्वारका चौक व आडगाव नाका येथे वाहनांच्या रांगा लागत असून, या कोंडीतून मार्ग काढण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.

चौकट=

कायमस्वरूपी उपाययोजना करू

महामार्गावर वाहन घसरण्याचे प्रकार पाहता, ज्या ठिकाणी हे प्रकार घडत आहेत, तेथील रस्ता पाण्याने स्वच्छ धुण्यात येत आहे तसेच जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावर चरे मारण्यात आले असून, काही रासायनिक प्रक्रिया करून हा प्रकार टाळण्याचाही प्रयत्न केला गेला; परंतु नवीन ठिकाणी हा प्रकार घडत असल्याने तूर्त पाऊस सुरू असल्यामुळे रस्ता बॅरिकेडिंगने बंद केला आहे. तथापि, कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी तंत्रज्ञांकडून सल्ला व शोध घेतला जाईल.

- दिलीप पाटील, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण