शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

विल्होळी येथील पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2017 14:53 IST

नाशिक : दारुच्या व्यसनापायी पत्नीचा छळ करून तीला जाळून मारणाºया आरोपी पती सागर दामोदर झोले (२६) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजाची मेठ येथील रहिवासी असलेला झोले हा विल्होळी येथील सासुरवाडीमध्ये पत्नी दोन लहान मुले व सासूसोबत राहत होता. दारुच्या आहारी गेलेल्या झोले याने सातत्याने पत्नीचा ...

नाशिक : दारुच्या व्यसनापायी पत्नीचा छळ करून तीला जाळून मारणाºया आरोपी पती सागर दामोदर झोले (२६) यास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महादरवाजाची मेठ येथील रहिवासी असलेला झोले हा विल्होळी येथील सासुरवाडीमध्ये पत्नी दोन लहान मुले व सासूसोबत राहत होता. दारुच्या आहारी गेलेल्या झोले याने सातत्याने पत्नीचा चारित्र्याच्या संशयावरुन छळ के ला. त्यामुळे पत्नीने त्याच्याविरुध्द अनेकदा तक्रारी केल्या. २३ नोव्हेंबर २०१५ रोजी त्याने पत्नी पुजाला पहाटेच्या सुमारास जाळून हत्त्या केली. हत्त्येनंतर झोले फरार झाला होता. त्याच्याविरुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यास अटक करुन न्यायालयापुढे हजर केले. न्यायालयाने सुरूवातीला पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारी (दि.१४) प्रधान न्यायाधीश सुर्यकांत शिंदे यांच्या न्यायालयात सुनावणी झाली. दरम्यान, सरकारी वकील अ‍ॅड. विद्या जाधव यांनी सरकार पक्षाकडून युक्तीवाद करत अकरा साक्षीदार तपासले. दरम्यान, प्रत्यक्षदर्शी नऊ ते दहा वर्षीय भाचीची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली. न्यायाधीश शिंदे यांनी या खटल्याचा फैसला अवघ्या तीन सुनावण्यांमध्ये केला.