शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक अडचणीतील क्लासचालकांना मदत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून सर्वप्रकारचे क्लासेस बंद असल्याने व यापुढेही नजीकच्या काळात क्लास ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : गेल्या तेरा ते चौदा महिन्यांपासून सर्वप्रकारचे क्लासेस बंद असल्याने व यापुढेही नजीकच्या काळात क्लास सुरू होण्याची शक्यता नसल्याने, जिल्ह्यातील व पर्यायाने महाराष्ट्रातील​ छोटे व घरगुती क्लासेस संचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. क्लास बंद असल्याने त्यांचा उदरनिर्वाहही आता कठीण झाला आहे. त्यामुळे अशा छोट्या व घरगुती क्लासेस संचालकांना सरकारने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी करणारे कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने मुख्यमंत्र्यांना सोमवारी (दि. १९) लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे. तसेच लोकप्रतिनिधींनीही क्लासचालकांच्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे आवाहनही संघटनेने केले आहे.

शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना नियमित वेतन चालू आहे, त्याचप्रमाणे मोठे व मध्यम क्लासेसचालकही थोड्या बचतीवर तग धरून आहेत. परंतु छोटे व घरगुती क्लासेस संचालकांचा मात्र कणा पुरता मोडला आहे. अनेक क्लासचालकांनी जागा सोडल्या आहेत, काहींचे भाडे थकले आहे, कर्जाचे हप्ते थकले आहेत, घरखर्चालाही आता उसनवार करण्याची वेळ आली आहे. त्यातच आजारपण, मुलांच्या संगोपनाची जबाबदारी, घरपट्टी, वीजबिल आदी खर्चांमुळे हे लोक अक्षरशः मेटाकुटीला आले आहेत. मागील महिन्यात, नाशिकमध्ये एका क्लासचालकाने आत्महत्या केली असून, एकाचे तणावामुळे हृदयविकाराने निधन झाल्याचेही संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी नमूद केले आहे.

अनेक क्लासचालक भाजीपाला विकणे व अन्य छोटे व्यवसायही करून पाहत आहेत. परंतु त्यात लॉकडाऊनमुळे पाहिजे तसे उत्पन्न मिळत नाही. ऑनलाइन क्लासेस अपयशी ठरत आल्याने या कठीण परिस्थितीत शासनाने अशा क्लासेस संचालकांना त्वरित आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी कोचिंग क्लासेस संचालक संघटना व जिल्हा संघटनेतर्फे करण्यात आली आहे. या पत्रावर खजिनदार अतुल आचलिया, सरचिटणीस लोकेश पारख, विभागप्रमुख पवन जोशी, महिलाप्रमुख पूनम कांडेकर यांसह उपाध्यक्ष अण्णासाहेब नरुटे, अरुण कुशारे, अशोक देशपांडे, मुकुंद रनाळकर आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.