शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार हेक्टरवरील शेतीपिकांना अतिवृष्टीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 22:41 IST

मालेगाव : येथील महसूल, कृषी व पंचायत समितीने संयुक्त पथकाने तालुक्यात पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या बाधित क्षेत्रातील नुकसानीचा अंतिम अहवाल सादर केला. तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सहा गावांना फटका बसला होता. तालुक्यात ३३ टक्क्यांवर ३००७.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ४ हजार ८१६ शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे नुकसानीपोटी मदत देण्यासाठी साधारण २ कोटी ४ लाख ५१ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमालेगाव तालुका : दोन कोटी अनुदानाची आवश्यकता, सहा गावांचे नुकसान

मालेगाव : येथील महसूल, कृषी व पंचायत समितीने संयुक्त पथकाने तालुक्यात पाहणी करून अतिवृष्टीमुळे झालेल्या बाधित क्षेत्रातील नुकसानीचा अंतिम अहवाल सादर केला. तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा सहा गावांना फटका बसला होता. तालुक्यात ३३ टक्क्यांवर ३००७.५३ हेक्टर क्षेत्रावरील पिके बाधित झाली आहेत. ४ हजार ८१६ शेतकऱ्यांना नुकसान झाले आहे नुकसानीपोटी मदत देण्यासाठी साधारण २ कोटी ४ लाख ५१ हजार रुपयांची आवश्यकता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच अतिवृष्टी झाली. जळगाव निंबायती भागात सर्वाधिक ६६ व निमगाव मंडळात ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. साकुरी निं, चौकटपाडे, जाटपाडे, निंबायती, पाथर्डे व जेऊर हा परिसरात सर्वाधिक पाऊस झाला. तहसीलदार राजपूत यांनी दुसऱ्याच दिवशी नुकसानग्रस्त गावांना भेटी देत पाहणी करून अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार महसूल, कृषी व पंचायत समितीच्या पथकांनी पहाणी करुन नुकसानीचा अंतिम अहवाल तयार केला आहे. बाजरी, मका, सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग, कांदा, कुळीद, मटकी या पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाला आहे. भरपाईचे अनुदान प्राप्त होताच त्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटप केले जाईल असे तहसीलदार राजपूत यांनी सांगितले.पिकांच्या नुकसानीची आकडेवारी (हेक्टरी)बाजरी-४५१.६४, मका-१५४९.०३, सोयाबीन-०१, तूर-०२, कापूस-५३६.३०, भुईमूग-१९.४०, कांदा-४३८.१६, कुळीथ-०५, मटकी-०५, एकूण बाधित क्षेत्र-३००७.५३, अपेक्षित निधी-२०४.५१ (लाखात)बाधित गावे -०६, बाधित शेतकरी संख्या - ४८१६. 

टॅग्स :agricultureशेतीGovernmentसरकार