शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलदार निलंबन प्रकरणाची सुनावणी लांबली

By admin | Updated: June 13, 2015 00:07 IST

सुरगाणा धान्य घोटाळा : सोमवारी होणार सुनावणी

नाशिक : सुरगाणा धान्य घोटाळा प्रकरणी शासनाने नेमलेल्या पाच सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल गुरुवारी सादर केल्यानंतर शुक्रवारी (दि. १२) याबाबत निर्णय होण्याची शक्यता होती; मात्र सरकारी वकील उपस्थित नसल्याने याबाबतची सुनावणी आता सोमवारी (दि. १५) ठेवण्यात आली आहे.गुरुवारी याबाबत राज्य शासनाच्या वतीने चौकशी समितीचा अहवाल मॅटसमोर सादर करण्यात आला, तसेच अधिकाऱ्यांचाही युक्तिवाद ऐकण्यात आला. राज्य शासनाचा अहवाल सादरकर्ता प्रतिनिधी नसल्याने त्याचे म्हणणे ऐकल्यानंतरच मॅट या प्रकरणी सोेमवारी निर्णय देणार आहे. सात तहसीलदारांच्या निलंबनाला मॅटमध्ये आव्हान देण्यात आल्याने त्यावर बुधवारी सुनावणी झाली. तहसीलदारांनी अपील दाखल केल्यनांतर मॅटने सरकारला म्हणणे सादर करण्याची सूचना केली. त्यावेळी सरकारने या साऱ्या प्रकरणाची येत्या १५ दिवसांत उच्चस्तरीय समितीमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे प्रतिज्ञापत्र मॅटसमोर सादर केले होते. त्यावर तहसीलदारांच्या वतीने बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी या चौकशी समितीचा अहवाल मॅटसमोर सादर करण्याची मागणी केली होती. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या पाच सदस्यीय समितीचाअहवाल गुरुवारी मॅटसमोर सादर करण्यात आला; मात्र अहवाल सादरकर्ता नसल्याने त्याचे म्हणणे शुक्रवारी ऐकून घेतल्यानंतर निर्णय देण्यात येणार होता; मात्र सरकारी वकीलच उपस्थित नसल्याने याबाबतचे कामकाज होऊ शकले नाही. त्यामुळे सोेमवारी हा युक्तिवाद ऐकल्यानंतरच मॅट निर्णय देणार असल्याने या निकालाकडे निलंबित तहसीलदारांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)