शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By admin | Updated: September 4, 2014 00:04 IST

साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

 

नांदूरशिंगोटे : पावसाच्या अधूनमधून कोसळणाऱ्या रिमझिम सरी व पाणी प्रवाहित न केल्याने येथील नाशिक - पुणे महामार्गालगत साचलेल्या पाण्याच्या डबक्यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात सापडले आहे. हे ठिकाण डास व विविध उपद्रवी कीटकांचे उत्पत्तीस्थान बनले आहे.नाशिक - पुणे हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ५० हा नांदूरशिंगोटे गावाच्या मध्यातून जातो. या मार्गालगत सुमारे दहा वर्षांपूर्वी रस्त्यावरील पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही बाजूने गटारी बांधण्यात आल्या होत्या. कालांतराने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे झालेले दुर्लक्ष व काही व्यावसायिकांनी गटारी बुजवल्याने रस्त्यावरून वाहून जाणारे पाणी प्रवाहित होत नाही. ते रस्त्याच्या कडेला एकाच ठिकाणी मोकळ्या जागेत साचून रहाते. साचलेल्या पाण्यात वाऱ्यामुळे उडून पडलेले कागद, प्लॅस्टिक पिशव्या, विविध खाद्यपदार्थांचे तुकडे, फळे व भाजीपाल्याचा कचरा यामुळे या पाण्याला दुर्गंधी येऊ लागली आहे. पावसाचे पाणी अनेक दिवसांपासून साचून राहिल्याने त्याला डबक्याचे स्वरूप आले आहे. हे ठिकाण म्हणजे डास, माशा, चिलटांचे उत्पत्ती केंद्र बनल्याने ग्रामस्थांना डासांपासून होणाऱ्या हिवताप, डेंग्यू आदि रोगांचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी नांदूरशिंगोटे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा करून हे पाणी प्रवाहित करण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. तथापि, त्यांनी हात वर करीत हे काम बीओटी तत्त्वावर दुसऱ्या कंपनीकडे देण्यात आल्याने महामार्ग विभागाकडून कोणतीही उपाययोजना होणार नसल्याची माहिती दिली. सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. या महामार्गाची देखभाल व दुरुस्ती पुढील वीस वर्षांसाठी खासगी कंपनीकडे बीओटी तत्त्वावर देण्यात आली आहे. त्यामुळे या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी व अन्य तक्रारींचे निराकरण करण्यासाठी कोणाकडे दाद मागायची असा प्रश्न ग्रामस्थांनी केला आहे. नाशिक - पुणे महामार्गालगतच पाणी साचले असून, एका बाजूने प्रचंड वाहने असल्याने दुसऱ्या बाजूने साचलेल्या पाण्यामुळे पायी चालणेही अवघड झाले आहे. त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. ग्रामस्थांना गावात जाता येत नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. तसेच येथे आरोग्य उपकेंद्र असूनही ग्रामस्थांच्या आरोग्यासाठी आरोग्य विभागकडून कोणतीही दखल घेतली नसल्याने अद्यापपर्यंत कोणत्याही विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. (वार्ताहर)