शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यालयातील ‘चाळीस’ कर्मचाऱ्यांची खांदेपालट

By admin | Updated: August 13, 2014 00:40 IST

मुख्यालयातील ‘चाळीस’ कर्मचाऱ्यांची खांदेपालट

नाशिक : गेल्या दोन महिन्यांपासून होणार होणार म्हणून कर्मचाऱ्यांना प्रतीक्षा असलेल्या जिल्हा परिषद मुख्यालयातील बहुचर्चित पाच वर्षांहून अधिक कार्यकाळ झालेल्या ४० कर्मचाऱ्यांच्या विभागात बदल करण्यात आल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र यातूनही कक्ष अधिकारी व कार्यालयीन अधीक्षक या संवर्गांना वगळण्यात आल्याने अन्य कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर सुरू झाला आहे.मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी आठ ते नऊ महिन्यांपूर्वी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर कर्मचाऱ्यांना व प्रशासनाला शिस्त लावण्यासाठी आवश्यक ते कठोर निर्णय घेण्यास सुरुवात केली होती. त्यातच एकाच विभागात व एकाच टेबलवर तीन ते पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे तीन वर्षांनंतर टेबल, तर पाच वर्षे झालेल्या कर्मचाऱ्यांचे विभाग बदलण्याची महत्त्वपूर्ण घोषणा सुखदेव बनकर यांनी केली होती. ही घोषणा प्रत्यक्षात आता आॅगस्टमध्ये अंमलात आली. चाळीस कर्मचाऱ्यांचे खांदेपालट अर्थात विभागात बदल करण्यात आले असून, त्यात कनिष्ठ सहायक- १६, वरिष्ठ सहायक- ५, कनिष्ठ सहायक लेखा- २, वरिष्ठ सहायक लेखा- १३, कनिष्ठ लेखाधिकारी- २ व सहायक लेखाधिकारी- २ अशा एकूण ४० कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यातही काढण्यात आलेल्या आदेशात काही कर्मचाऱ्यांच्या विभागात अंशत: बदल करण्याचीही तत्परता प्रशासनाने दाखविल्याचे कळते. विशेष म्हणजे, अंतर्गत बदलाची कार्यवाही करून काही तास उलटत नाही तोच मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांना ठरावीक कर्मचाऱ्यांना आहे त्याच जागेवर ठेवण्यासाठी काही लोकप्रतिनिधींच्या ‘शिफारशीही’ तत्परतेने आल्याचे कळते. (प्रतिनिधी)