शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

युती-आघाडीच्या तळ्यात मळ्यातने वाढविली उमेदवारांची डोकेदुखी

By admin | Updated: October 20, 2016 01:41 IST

नाशिक पदवीधर निवडणूक : रणधुमाळी सुरू

नाशिक : डिसेंबरमध्ये मुदत संपत असलेल्या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी शिवसेना-भाजपाची युती आणि कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी याबाबत ठोस निर्णय होत नसल्याने भाजपा आणि कॉँग्रेस उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. दोन्ही बाजूने युती आणि आघाडी होण्याची अपेक्षा उमेदवारांना आहे. तसे झाल्यास हा सामना तिरंगी होण्याची चिन्हे आहेत.नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी भाजपाच्या वतीने डॉ. प्रशांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर कॉँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. राज्यभरातील ११ जागांसाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये आघाडी करण्याचे घोडे अडले आहेत. दोन्ही पक्षाच्या वरिष्ठांच्या मुंबईत बैठका होऊनही अद्याप आघाडीचा निर्णय झालेला नाही. त्यातच दिल्लीला कॉँग्रेसच्या हायकमांडच्या बैठकीतही आघाडीबाबत नकारात्मक सूर असल्याचे समजते. तिकडे ठाण्यात विधान परिषदेच्या जागेसाठी शिवसेनेचे उमेदवार रवींद्र फाटक यांच्यासाठी भाजपाकडून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निवडणुकीच्या प्रचारात उतरले होते. त्याची भरपाई म्हणून नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी शिवसेनेने भाजपाला मदत करावी, असा भाजपाचा आग्रह आहे; मात्र नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेना कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी युती करायची तर सन्मानाने करा, आम्ही कटोरे घेऊन फिरणार नाही, असा इशारा दिल्याने भाजपासोबत युती होते की नाही? याबाबत चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)