शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
5
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
6
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
7
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
8
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
9
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
10
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
11
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
12
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
13
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
14
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
15
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
16
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
17
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
18
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
19
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
20
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
Daily Top 2Weekly Top 5

‘हॉकर्स झोन’ मार्गी लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2016 23:55 IST

महासभेवर प्रस्ताव : आॅगस्टपासून अंमलबजावणी शक्यं

 नाशिक : राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने निश्चित केलेल्या हॉकर्स झोनचा आराखडा मार्गी लागण्याची चिन्हे असून, येत्या १६ जून रोजी होणाऱ्या महासभेवर प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे. महासभेची मंजुरी प्राप्त झाल्यानंतर आॅगस्ट २०१६ पासून हॉकर्स झोनची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिकेने २३९ हॉकर्स झोन निश्चित केले असून, नोंदणीकृत ९६२० फेरीवाल्यांना सोडत पद्धतीने जागांचे वाटप केले जाणार आहे. शहरात ८३ ठिकाणे ‘ना फेरीवाला क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आली असून, १७३ ठिकाणी मुक्त फेरीवाला क्षेत्र, तर ६६ ठिकाणी टाइम झोन निश्चित करण्यात आले आहेत. गेल्या दीड-दोन वर्षांपासून राष्ट्रीय फेरीवाला समित्यांच्या बैठका, पोलीस आयुक्तालयांचे अभिप्राय, क्षेत्रपाहणी या साऱ्या प्रकारातून जात महापालिकेने हॉकर्स झोन निश्चित केले आहेत. शहर फेरीवाला समितीने शिक्कामोर्तब केल्यानंतर प्रशासनाने मार्च २०१६ च्या महासभेत हॉकर्स झोनचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला होता. परंतु महापौर अशोक मुर्तडक यांनी हॉकर्स झोनबाबत सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक बोलावून अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचे घोषित केले होते. त्यानंतर महापौरांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठकही बोलाविली होती; परंतु या बैठकीतही हॉकर्स झोनवर चर्चा न करता पुन्हा महासभेवर त्याबाबत निर्णय घेण्याचे महापौरांनी जाहीर केले. या टोलवाटोलवीत अखेर गुरुवार, दि. १६ जून रोजी होणाऱ्या महासभेत आयुक्तांनी पुन्हा एकदा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. दोन-तीन वेळा टोलवाटोलवी झाल्याने आता महासभेवर सदर प्रस्तावावर चर्चा होण्याची शक्यता आहे. गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीप्रसंगी नव्याने काही हॉकर्सची नोंदणी करण्याचे तसेच व्यवसायासाठी १५ वर्षांचे अधिवास प्रमाणपत्र घेण्याची सूचना करण्यात आली होती. येत्या महासभेत त्यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. महासभेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यास आॅगस्ट २०१६ पासून त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास पुणे नंतर हॉकर्स झोनची अंमलबजावणी करणाऱ्याच्या यादीत नाशिकचा समावेश होणार आहे. (प्रतिनिधी)