त्र्यंबकेश्वर : भारतातील दक्षिण गंगा म्हणून समजली जाणार्या पवित्र गंगा गोदावरीचा व महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी दिंडोरी मतदारसंघातील भाजपाचे खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थान न्यासतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांबद्दल माजी नगराध्यक्ष व विद्यमान देवस्थान विश्वस्त कैलास घुले यांनी माहिती देऊन अद्याप एकही काम सुरू न झाल्याबद्दल तक्रार केली. आपण लक्ष घालावे तसेच केंद्र सरकारकडून काही निधी मिळण्यासाठी व कामे करण्याबाबत सुचविले. यावर खासदार म्हणाले, कुंभमेळ्याचे महत्त्व मला माहीत आहे. केवळ देशातूनच नव्हे तर विदेशातूनदेखील भाविक येत असतात. त्र्यंबकेश्वरचा विकास व्हावा, सिंहस्थापूर्वीची कामे होणे गरजेचे आहे गरज पडल्यास आपण केंद्र सरकारकडून निधी आणण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. त्र्यंबकेश्वर देवस्थानतर्फे नवनिर्वाचित खासदारांना शाल, श्रीफळ व भेटवस्तू म्हणून भगवान त्र्यंबकराजाची प्रतिमा दिली. यावेळी कैलास घुले, ॲड. श्रीकांत गायधनी, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजाभाऊ जोशी आदिंसह गावातील भाजपा-सेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)
हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतले त्र्यंबकेश्वराचे दर्शन
By admin | Updated: May 24, 2014 12:09 IST