शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बायकोकडून होतोय छळ; कोरोना काळात २५ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:13 IST

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा ...

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊन काळात अनेकांच्या घरांमध्ये एक ना अनेक कारणांवरून मतभेद होऊन वादविवादाचे प्रसंग घडले. अनेकदा वादविवादाला अगदी क्षुल्लक कारणेही पुरेशी ठरल्याचे पोलिसांकडे आलेल्या तक्रारींवरून दिसून येते. शहरातील भरोसा सेलकडे (महिला सुरक्षा शाखा) अशाचप्रकारे या काळात महिलांच्या घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. कधी मोबाईल मग्नता, तर कधी कामाचा वाढता व्याप, तर पतीकडून कामाच्या व्यापामुळे केली जाणारी चिडचिड... अशा विविध कारणांमुळे दाम्पत्यांमध्ये वाद घडले. त्याचप्रमाणे मुलांकडे लक्ष न देणे, स्वयंपाकात चुका करत आई-वडिलांच्या प्रकृतीविषयी काळजी न दाखविल्याचा आरोप करीत ९०७ पतींकडून त्यांच्या पत्नीविरुद्ध छळ केल्याच्या तक्रारी पोलिसांकडे मागील सहा महिन्यांत दाखल झाल्या आहेत. या तक्रारींमधील तथ्य शोधण्याचे मोठे आव्हान आता ‘भरोसा सेल’पुढे उभे राहिले असून, पती-पत्नींचे जाब-जबाब नोंदवून घेत तक्रार अर्जांची चौकशी केली जात आहे.

---इन्फो--

आर्थिक टंचाई अन्‌ जास्त सहवास

कोरोना काळात पती-पत्नीमध्ये सहवास अधिकाधिक वाढला. दोघांनाही एकमेकांसोबत जास्त वेळ घालविण्यास वाव मिळाला; मात्र याचे काही कुटुंबांमध्ये दुष्परिणामही दिसून आले, तर काहींनी ही एक चांगली संधी म्हणून एकमेकांची काळजी घेत समजून घेण्याचा प्रयत्नही केला. आर्थिकदृष्ट्‌या निर्माण झालेली टंचाईदेखील वादविवादाच्या ठिणगीला कारणीभूत ठरत आहे.

-

---

अशी आहेत वाद-विवादाची कारणे...

मुलांच्या अभ्यासाकडे ती सतत दुर्लक्ष करते.

कामाचा व्याप वाढल्याने सतत घरात चिडचिड करीत वृद्ध सासू-सासऱ्याकडे दुर्लक्ष करते.

नोकरीच्या ठिकाणचा कामाचा किंवा वरिष्ठांविषयीचा राग घरात व्यक्त करणे.

मोबाईलवर सारखे का बोलते? अशा विविध तकलादू कारणांवरून पतींकडून पत्नीविरुद्ध तक्रारी करण्यात आल्या आहेत.

---पॉइंटर्स---

पुरुषांच्या महिलांविरुद्ध तक्रारी - २४

महिलांच्या पुरुषांविरुद्ध तक्रारी - ९०७

भरोसा सेलकडे आलेल्या एकूण तक्रारी - ९३१

----इन्फो--

३१ बायका पुुन्हा नांदण्यास...

कोरोना काळात उद‌्भवलेल्या वादविवादाच्या प्रसंगानंतर भरोसा सेलकडे आलेल्या तक्रारींनंतर पती-पत्नींची समजूत पोलिसांकडून काढण्यात आली. संसारवेल कोमेजू देऊ नये, यासाठी सप्तपदीत एकमेकांना दिलेल्या वचनांचे स्मरण पोलिसांकडून करून देण्यात आले. तसेच बहुतांश दाम्पत्यांचे समुपदेशनही पोलिसांनी केले. पतीपासून दुरावलेल्या ३१ महिलांचे एप्रिलअखेरपर्यंत मनपरिवर्तन करण्यास पोलिसांना यश आले. ९७ दाम्पत्यांमध्ये न्यायालयात समझोता झाला.

250721\25nsk_12_25072021_13.jpg

बायकोकडून छळ