शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 01:16 IST

सायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कसायखेडा : संततधार पाऊस व धरण क्षेत्रातून पाण्याच्या विसर्गामुळे सायखेडा परिसरात गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकरी आता पंचनामा कधी होतो याची वाट पाहत आहे. सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चापडगाव आदी गावांतील शेतांमध्ये अद्यापही पाणी साचलेले आहे. त्यामुळे पूर ओसरला तरी पुराच्या पाऊलखुणा अद्यापही आहेत. शेतातील भाजीपाला पिकांना सर्वाधिक फटका बसला आहे. नदीलगत असलेल्या वीटभट्टीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस थांबल्यामुळे जनजीवन पूर्वपदावर आले आहे. सायखेडा व चांदोरी परिसरातील पूरस्थिती आज पाणी ओसरल्याने पूर्व पदावर आली आहे.  यावेळी प्रशासनाच्या योग्य नियोजनामुळे पूरस्थिती गंभीर झाली नसली तरी पुरामुळे शेतकरीवर्गाला मोठा आर्थिक फटका बसला आहे. योग्य वेळी नांदूरमधमेश्वर  धरणातून पाण्याचा विसर्ग होत राहिल्याने मोठ्या पुराचा धोका टळला. अन्यथा गोदाकाठ पूर्ण जलमय झाला असता; मात्र शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी सायखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.  पानवेली नदीबाहेर काढल्या जात होत्या. पण काम अतिशय संथ गतीने सुरू होते. पूर आला असता पाटबंधारे खात्याला जाग आली आणि रात्री जेसीबीच्या  साह्याने पानवेली काढण्याची कसरत करावी लागली. पानवेलींमुळे सायखेडा पुलाला धोका निर्माण होतो हे माहीत असतानाही पाटबंधारे खाते वेळकाढूपणा का करते, असा  सवाल उपस्थित होत आहे. सकाळपासून पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाल्याने काहीसा दिलासा मिळाला.