शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधातील कट उधळला! शोपियात ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
2
"भारत १७ दिवसांत पुन्हा हल्ला करू शकतो, कारण..."; पाकिस्तानच्या बड्या नेत्याला धाकधूक
3
चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय
4
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
5
प्रेयसीवर कोयत्याने वार करुन संपवले, स्वतःही घेतला गळफास; रायगडच्या परळीतील घटना
6
"मला घाबरवलं..."; पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या सल्लागाराच्या घरी बॉम्बस्फोट
7
मराठी अभिनेत्रीचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल चकित! एका वर्षात घटवलं 'इतकं' वजन; म्हणाली...
8
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
9
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
10
भारतीय नागरिकांचं ठरलंय! तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकच्या 'मित्रां'चा 'करेक्ट कार्यक्रम' होणार
11
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
12
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
13
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
14
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
15
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
16
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
17
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
18
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
19
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
20
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

By admin | Updated: March 30, 2015 00:28 IST

गारपिटीने द्राक्षनिर्यातीला तडाखा

नाशिक : द्राक्ष उत्पादकांच्या आणि निर्यातक्षम द्राक्षबागांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर यंदा द्राक्षांची विक्रमी निर्यात होईल असे वाटत असतानाच झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे स्वप्न धुळीस मिळाले. त्या गारपिटीचा फटका बसून मागील वर्षीच्या तुलनेत द्राक्षनिर्यातीत सुमारे १० टक्के घट झाल्याचे अपेडाची आकडेवारी सांगते. त्यामुळे २० मार्चपर्यंत यंदा ३६०७८ मेट्रिक टन म्हणजेच २८३२ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली आहे.मागील वर्षी राज्यातून २९ मार्चपर्यंत ३९२३१ मेट्रीक टन म्हणजेच ३०६३ कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली होती. यंदा आत्तापर्यंत केवळ २८३२ कंटेनरची निर्यात झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत त्यात सुमारे ३२०० मेट्रीक टनांची घट झाली आहे. यंदा द्राक्षांचे उत्पादन आणि निर्यात दोन वर्षांच्या तुलनेत चांगली राहील असे वाटत होते. उत्पादनही तसेच आले होते. निर्यातक्षम द्राक्षांना परदेशात ५० ते ६० रुपये प्रतिकिलो असा दर मिळतो आहे. त्याची विक्री परदेशी व्यापारी भारतीय चलनानुसार २०० ते २५० रुपये किलोने करतात. आणखी किमान महिनाभर द्राक्षांचा हंगाम चालू राहणार असून, मागच्या वर्षीचे निर्यातीचे रेकॉर्ड तुटेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. युरोप, चीन, चिली, दक्षिण आफ्रिका यांसह इतर देशांमधील द्राक्षांचा दर्जा भारतीय द्राक्षांपेक्षा चांगला आणि वाहतूक खर्च आपल्या खर्चाच्या तुलनेत केवळ २५ टक्केच असल्याने त्यांच्या उत्पादनाला चांगली मागणी असते. असे असले तरी त्याची उत्पादन क्षमता भारतापेक्षा कमी असल्याने परदेशी द्राक्षांच्या उत्पादनानंतरही भारतीय द्राक्षांची परदेशातील मागणी कायम राहाते. एकूण निर्यात ४००० कंटेनरपर्यंत जाऊ शकेल असा अंदाज वर्तविला जातो आहे. द्राक्षांच्या निर्यातीत सुमारे ७५ टक्के वाटा एकट्या नाशिक जिल्ह्याचा असतो असे आकडेवारीवरून दिसून येते. नाशिक जिल्ह्यातून मार्जअखेर एकूण सुमारे २२०० कंटेनर द्राक्षांची निर्यात झाली असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तेही घटले आहे. असे असले तरी येणाऱ्या काळात जर वातावरण चांगले राहिले तर निर्यात मागील वर्षीचा स्तर पार करू शकते आणि ओलांडू शकते असाही अंदाज लावला जातो आहे. (प्रतिनिधी)