शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

गुलाबालाही नोटाबंदीचा फटका

By admin | Updated: January 18, 2017 23:41 IST

निर्यातीचा आधार : गतवर्षीच्या दुष्काळामुळे उत्पादन घटूनही बाजार घसरले

नामदेव भोर : नाशिककेंद्र सरकारने जुन्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटांबर बंदी घातल्याचा फटका गुलाब शेतीलाही बसला असून, नागरिकांनी घरगुती कार्यक्रम तथा लग्नसमारंभामध्ये गुलाबांची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे गुलाबाच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात घट झाली असून, व्हॅलेंटाइन डेच्या कालावधीत सरासरी १५ ते १७ रुपयांचा गुलाब ५ ते ६ रुपयांनी विक्री होत असल्यामुळे गुलाब उत्पादक शेतकरी निर्यातीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत.  युरोपीय राष्ट्रांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या बर्फवृष्टीमुळे गोठवणाऱ्या थंडीत आणखीनच वाढ झाली असून, चहुकडे बर्फाळलेल्या पांढऱ्या शुभ्र वातावरणाने वेढलेल्या पाश्चिमात्य देशांमध्ये ख्रिसमसनंतर सध्या ‘व्हॅलेंटाइन डे’ ची धूम असल्याने प्रेमाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गुलाबांना प्रचंड मागणी असते. याच कालावधीत देशात नोटाबंदीचा फटका बसल्यामुळे गुलाबाच्या फुलांना मागणी घटली आहे. त्यामुळे बाजार भावातही घसरण झाली आहे.  गतवर्षी दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी गुलाबाच्या बागा काढल्याने उत्पादनात मोठी घट झाली आहे. तरीही फुलांचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांसमोर फुलांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत गुलाब उत्पादकांनी फुलांची निर्यात करण्यालाच अधिक प्राधान्य दिले आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातून निर्यातीचे प्रमाण वाढले असून, ‘व्हॅलेंटाइन डे’च्या कालावधीत सुमारे ३९ ते ४० लाख फुलांची निर्यात होण्याचा अंदाज निर्यातदार संस्था व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी)