पिंपळगाव बसवंत : मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या कर्मयोगी दुलाजी सिताराम पाटील कृषी महाविद्यालयावतीने ग्रामीण कृषी कार्यानुभवअंतर्गत सातव्या सत्रातील कृषीकन्यांनी पिंपळगाव बसवंत परिसरातील कारसुळ येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतक-यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती तसेच माती संकलन, परीक्षण, कीड व रोग यांचे एकत्रित व्यवस्थापन, जनावरांचे व्यवस्थापन व संगोपन आणि शेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण करत माहिती देण्यात आली.यावेळी दिपाली तिडके, आरती वर्पे, योगेश्वरी वेताळे, माधुरी वाघ, रोहीणी बागुल, साक्षी नागरे, दिपाली सोनवणे, दिप्ती पवार, अंजली लाड या कृषिकन्या उपस्थित होत्या. याप्रसंगी कारसुळचे सरपंच रामकृष्ण कंक, उपसरपंच योगिता पगार, सदस्य निलेश ताकाटे, विजय काजळे, बापु वाघचौरे, संजय जाधव, भानुदास दाते, ज्ञानेश्वर गांगुर्डे, भागवत जाधव, कृष्णा साळुंके, मनोज कडपे, दिलीप कोपटे, सुरज शेख, नंदु गांगुर्डे, ग्रामसेवक आर. के.वाघ व ग्रामस्थांनी कृषिकन्याचे स्वागत केले. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र काजळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आय. बी.चव्हाण, प्रा.एस.यु. सुर्यवंशी,प्राध्यपिका के. जे. पानसरे यांचे या कृषीकन्यांना मार्गदर्शन लाभले.
कृषीकन्यांचे कारसूळच्या शेतक-यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 15:53 IST
कार्यानुभव : नवीन तंत्रज्ञानाची दिली माहिती
कृषीकन्यांचे कारसूळच्या शेतक-यांना मार्गदर्शन
ठळक मुद्देशेतीविषयक विविध समस्या व त्यावरील उपाय आदी विषयांचे सखोल विश्लेषण