शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

गुढी पाडवा : स्वागतयात्रांनी फुलले नाशिकचे रस्ते; जनजागृतीवर भर

By admin | Updated: March 28, 2017 16:01 IST

शहरासह उपनगरांमधून स्वागतयात्रा काढून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी नाशिकचे रस्ते फुलून गेले होते.

नाशिक : गुढी पाडवा सणाच्या औचित्यावर हिंदू नववर्षाचे स्वागत करत शेकडो नागरिकांनी पारंपरिक वेशभूषेत सकाळी शहरासह उपनगरांमधून स्वागतयात्रा काढून नागरिकांचे लक्ष वेधले. यावेळी नाशिकचे रस्ते फुलून गेले होते.चैत्र शुध्द प्रतिपदेला ‘गुढीपाडवा’ साजरा होतो आणि हिंदू नववर्षालाही प्रारंभ होतो. शहरातील उच्चभू्र परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महात्मानगर, पंडीत कॉलनी, कॉलेजरोड, शरणपूररोड, नरसिंहनगर, तिडके कॉलनी आदि परिसरातून आठ ठिकाणांवरून नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने स्वागत यात्रांचे आयोजन करण्यात आले होते.

सिडको, इंदिरानगर, नाशिकरोड, जुने नाशिक, पंचवटी आदि परिसरांमधूनही स्वागत यात्रा काढण्यात आल्या होत्या. स्वागत यात्रांमध्ये महिला, युवती पारंपरिक पोशाखात सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे स्वागत यात्रांमध्ये पुरूषवर्गही पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. यावेळी बाळगोपाळांनी राष्ट्रपुरूषांच्या वेशभूषा करून नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.दरम्यान, नाशिककरांनी जनजागृतीवरही भर दिला. प्लॅस्टिक मुक्ती, अवयव दान, चिमणी संवर्धन, वृक्षसंवर्धनाविषयी जनजागृती केली. तसेच महिलांनी शहरातून पारंपरिक वेशभूषेत दुचाकी फेरी काढली. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे फलक दर्शवित महिलांनी लक्ष वेधले. शोभायात्रांमध्ये काही महिला घोड्यावर तर काही हत्ती व उंटावरदेखील विराजमान असल्याचे चित्र बघावयास मिळाले. ढोलपथक, लेझीम पथकाने शोभायात्रांमध्ये सहभागी नागरिकांचा उत्साह वाढविला.