शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा कामांवर पालकमंत्री नाराज

By admin | Updated: April 16, 2015 00:28 IST

कबुली : कामे मात्र वेळेत पूर्ण होणार

नाशिक : कुंभमेळ्याच्या कामांच्या दर्जाविषयी प्रश्न उपस्थित झाला असताना आता पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याच्या कामांमध्ये त्रुटी असल्याची कबुली देत त्यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.कुंभमेळ्यासाठी महापालिकेने आधी अडीच हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार केला होता. त्यानंतर राज्य शासनाने त्यात कपात केली आणि एक हजार ५२ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी सध्या सुरू असून, कोट्यवधी रुपयांची कामे सुरू आहेत. यात अंतर्गत आणि बाह्य रिंगरोड, तसेच साधुग्राममधील मूलभूत सोयीसुविधा, तसेच अन्य दीर्घ योजनांची कामे सुरू आहेत. या कामांच्या दर्जाविषयी वेळोवेळी शंका उपस्थित केली जात आहे. त्यात आता खुद्द पालकमंत्र्यांनीच कामात त्रुटी असल्याची कबुली दिली आहे.नाशिक दौऱ्यावर आलेले पालकमंत्री महाजन यांनी साधुग्राममध्ये सुरू असलेली शेडची कामे, तसेच शौचालय आणि अन्य कामांची पाहणी केली. घाटाच्या कामांचीदेखील त्यांनी पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी कुंभमेळ्याची कामे सुरू आहेत. तथापि, अनेक ठिकाणी कामात त्रुटी आहेत. खिळे ठोकण्यापासून शौचालयाच्या भांड्यापर्यंत त्रुटी असल्याचे त्यांनी मान्य केले. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. काही कामांसाठी ठरावीक परराज्यातील ठेकेदारच सर्व कामे करतात, त्यांनाच जबाबदारी देण्यात आली असून, कुंभमेळ्याची सर्व कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, आमदार बाळासाहेब सानप आणि आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)