शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
2
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
3
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
4
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
5
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
6
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
7
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
8
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
9
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
10
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
11
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
12
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
13
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
14
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
15
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
16
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
17
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
18
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
19
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
20
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
Daily Top 2Weekly Top 5

विकास दराचा आलेख ‘अच्छे दिन’चे द्योतक

By admin | Updated: June 8, 2016 23:06 IST

सुभाष भामरे : सटाणा येथे विविध कार्यक्रम

 सटाणा : आपल्या देशाचा विकास दर गेल्या दोन वर्षांपूर्वी म्हणजेच यूपीए सरकारच्या काळात चार टक्के होता. या दोन वर्षांच्या मोदी सरकारच्या काळात हा विकास दर ७.६५ टक्क्यांवर आला आहे. हा विकासाचा वाढता आलेखच खऱ्या अर्थाने ‘अच्छे दिन’चे द्योतक असल्याचे प्रतिपादन खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले.केंद्रातील एनडीए सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्ताने सटाणा शहरात खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी ज्येष्ठ नागरिक, डॉक्टर असोसिएशन, वकील संघ, व्यापारी संघटना, हमाल मापारी व महायुतीच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी जनधन विमा योजना, सुकन्या समृद्धी योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना अशा विविध महत्त्वाकांक्षी योजनांबद्दल माहिती दिली. परदेशी कंपन्यांनी ६५ अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे. त्याचा बेकारी दूर होण्यास मोठा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. युरिया, इथेनॉल, कोळसा आणि विजेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट करून इंदूर-धुळे-मनमाड रेल्वे मार्गासाठी खास बाब म्हणून विशेष आर्थिक तरतूद केल्यामुळे या कामाला गती मिळून आपल्या भागाचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे खासदार डॉ. भामरे यांनी सांगितले. सटाणा बायपास रस्त्याबाबत ते म्हणाले की, पश्चिमेकडून होणाऱ्या बायपाससाठी मुंजवाड व तरसाळीच्या १२० शेतकऱ्यांनी हरकती घेतल्यामुळे आता दुसरा पर्याय समोर आला असून, वनोली ते चौंधाणे हा रस्ता केंद्राच्या राखीव निधीमधून सात मीटर रुंद करून हा मार्ग राज्यमार्ग १९ ला जोडून मुंजवाड,ङ्क्तदऱ्हाणेवरून वाहतूक वळविण्यात येणार आहे. या बायपासबाबत तत्काळ प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही खासदार डॉ. भामरे यांनी संबधित यंत्रणेला दिल्या. यावेळी रमेश देवरे, श्रीधर कोठावदे, संजय भामरे, मुन्ना सोनवणे, बिंदू शर्मा, अण्णा अहिरे, नीलेश पाकळे, राजेंद्र देवरे, जिभाऊ मोरकर, राहुल सोनवणे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)