शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 00:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दाभाडी, सटाणानाका, मालेगाव कॅम्प, झोडगे, रावळगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

मालेगाव : छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी दाभाडी, सटाणानाका, मालेगाव कॅम्प, झोडगे, रावळगाव आदी ठिकाणी अश्वारूढ पुतळ्यावर पुष्पवृष्टी, प्रतिमापूजन करण्यात आले. येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासह मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाऱ्यांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मालेगाव : शहर-परिसरात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती अपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमा व पुतळ्याचे पूजन करण्यात आले.येथील शिवतीर्थावरील अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला मध्यवर्ती शिवजयंती समितीच्या पदाधिकाºयांसह राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, महापालिकेच्या अधिकाºयांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सायंकाळी सवाद्य मिरवणुका काढण्यात आल्या. या मिरवणुकांमध्ये तरुणाईने हातात भगवे झेंडे घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष केला होता. ठिकठिकाणी भगवे झेंडे लावण्यात येऊन कमानी उभारण्यात आल्याने शहर भगवेमय झाले होते. कृषिमंत्री दादा भुसे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.मध्यवर्ती शिवजयंती उत्सव समितीने सवाद्य शिवज्योत मिरवणूक काढली होती. दोन अश्वांवर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवराय यांच्या वेशातील दोघा तरुणांना बसवून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत लेजीम नृत्य लक्षवेधी ठरले होते. या मिरवणुकीत विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते. समितीचे अध्यक्ष दीपक पाटील, कार्याध्यक्ष निंबा निकम, शरद बच्छाव, अमोल चौधरी, शंकर नागपुरे, अनिल भुसे, अजय गवळी, राजाराम पाटील, भरत पाटील, अ‍ॅड. चंद्रशेखर देवरे, जितेंद्र देसले, प्रमोद शुक्ला, रामदास बोरसे, कैलास तिसगे, जगदीश पाटील, राजू अलिझाड, अशोक पाटील, कैलास शर्मा, शरद पाटील, राम शिंपी, केवळ हिरे, पंडित जाधव, प्रमोद पाटील आदींनी सहभाग घेतला.

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज