शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन

By admin | Updated: May 15, 2014 00:09 IST

३५७वी जयंती : सामाजिक संघटनांकडून प्रतिमापूजन

३५७वी जयंती : सामाजिक संघटनांकडून प्रतिमापूजननाशिक : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३५७ व्या जयंतीनिमित्त शहरातील विविध सामाजिक संघटनांकडून महाराजांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. विविध कार्यक्रमांद्वारे संभाजी महाराजांच्या शौर्याचे दर्शन घडविण्यात आले. काही ठिकाणी साहसी मैदानी खेळ, तलवारबाजी, दांडप˜ा, लाठीकाठी आदि खेळांचे प्रात्यक्षिक यावेळी शिवप्रेमींना दाखविण्यात आले. बालगोपाळ, युवक व ज्येष्ठ नागरिकांनी या साहसी खेळांचा आनंद लुटला. यामुळे शिवमय वातावरण तयार झाले होते. संभाजी ब्रिगेडयेथील संभाजी ब्रिगेडच्या वतीने जुन्या नाशकातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांचा वास्तव इतिहास व चरित्र जनमानसाला समजू लागले आहे. त्यांचा विद्वत्ता दर्शविणारा स्वभाव, स्त्रियांचा आदर करणारे गुण आजच्या युवा पिढीने आत्मसात करणे गरजेचे असल्याचे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष संतोष गायधनी, महानगरप्रमुख नितीन रोठेपाटील, विकी गायधनी, हिरामण वाघ, पुरुषोत्तम गोरडे, प्रफुल्ल वाघ, नीलेश कुसमोडे, बंटी दाते, वैभव दाते, श्रीकांत पगार, अमोल वडजे आदि उपस्थित होते.छावा विद्यार्थी आघाडीअखिल भारतीय छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने आडगाव येथे छत्रपती संभाजी राजेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष प्रा. उमेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवप्रेमी नागरिकांना लाडूचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक मीना माळोदे, जे. टी. शिंदे तसेच छावाचे मधू कासार, जगदीश जाधव, संजय सोमासे, नितीन सातपुते, आशिष हिरे, शरद श्िंादे, विजय उगले आदिंसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. विलास माळोदे यांनी सूत्रसंचालन केले. छावा मराठा कृती समितीछावा मराठा कृती समितीच्या वतीने जुन्या नाशकातील डिंगरआळीत छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रमोद बोरसे, जिल्हा संपर्कप्रमुख किशोर पारखे, राष्ट्रवादीचे पंचवटी अध्यक्ष देवांग जानी, स्वप्नील पगार, हर्षद पवार, तेजस पवार, तुषार हिरे, विवेक पाटील, दीपक फलटने, बाळासाहेब सूर्यवंशी आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.