नाशिक : देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी आज शपथ घेत असताना भाजपाच्या कार्यात योगदान देणारे कार्यकर्ते व शहरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भाजपाच्या वतीने त्यांच्या घरोघरी जाऊन सत्कार करण्यात आला़ भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी़, प्रकाश दीक्षित यांच्यासह सर्व मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या घरी जाऊन त्यांचा सत्कार केला़ यामध्ये प्रामुख्याने रमेश गायधनी, दादा रत्नपारखी, नानासाहेब गर्गे, मेजर पी़ बी़ कुलकर्णी, राजाभाऊ मोगल, निशिगंधा मोगल, मंगला जोशी, विनायक गोविलकर, देवीदास गर्दे, राजाभाऊ गुजराथी, एस़ जी. देशपांडे यांच्यासह ७० ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार नाशिक मध्य-पश्चिम मंडलच्या वतीने करण्यात आला़ सिडको मंडलच्या वतीने अध्यक्ष जगन्नाथ पाटील, बाळासाहेब पाटील व कार्यकर्त्यांनी सिडको परिसरातील बाबा पाटील, सदाशिव मरूलेकर, अण्णा पाहरेकर, हरिभाऊ पुजारी, सुधीर देशमुख यांच्यासह २० ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला़ सातपूर मंडलच्या वतीने झुंबरराव भंदुुरे, बाबा फ डके, पोपटराव कारभार, किसन विधाते, पुंडलिक काठे यांच्यासह १३ ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला़ यावेळी मंडल अधिकारी संजय राऊत व पदाधिकारी उपस्थित होते़ पंचवटी मंडलच्या वतीने गोपाळ ठाकूर, प्रशांत दळवी, वालजीभाई पटेल, शरद गर्गे, नंदू मुठे, किसनराव शिंदे यांसह १७ जणांचा सत्कार करण्यात आला़ मंडलाधिकारी श्याम पिंपरकर, बापू सिनकर, दिगंबर धुमाळ आदि उपस्थित होते़ शाल, श्रीफ ळ, पुष्पगुच्छ, पेढे असे सत्काराचे स्वरूप होते़ (प्रतिनिधी)
संघाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांप्रति कृतज्ञता
By admin | Updated: May 27, 2014 16:58 IST