शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वणीतील द्राक्षे गेली परदेशात

By admin | Updated: January 16, 2017 00:39 IST

कॅशलेस : राष्ट्रीयीकृत बँकेच्या माध्यमातून व्यवहार

वणी : निर्यातक्षम द्राक्ष उत्पादनात अग्रेसर असणारा दिंडोरी तालुका सर्वत्र परिचित असून, तालुक्यातील अनेक उत्पादकांनी निर्यातक्षम द्राक्षे उत्पादित करून नावलौकिक कायम ठेवला आहे. यावर्षीही वणी परिसरातील निर्यातक्षम द्राक्षे युनायटेड किंगडम येथे निर्यात करून वणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवून सुधाकर घडवजे यांनी वणीचे नाव सातासमुद्रापार पोहोचविले आहे. २८ एकर द्राक्षबाग असलेल्या घडवजे यांनी १९ एकरमध्ये युरो गॅप प्रणालीनुसार निर्यातक्षम सिडलेस थॉमसन द्राक्षे उत्पादित केली आहेत. रेसिड्यूमुक्त द्राक्ष तपासणी अहवालासाठी पुणे, बेंगळुरू, हैदराबाद येथील प्रयोगशाळेत कृषी विभागामार्फत नमुने पाठविण्यात येतात. सुमारे पाच किलो वजनाची द्राक्षे नमुना तपासणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल आल्यानंतर निर्यातदारांच्या माध्यमातून सदरची द्राक्षे परदेशात पाठविण्यात येतात. वणी-कळवण रस्त्यावर असलेल्या द्राक्षबागेतून सकाळी ६ ते १० वाजेपर्यंत द्राक्षांची खुडणी करण्यात येते. सकाळच्या सुमारास द्राक्ष खुडणीसाठी अनुकूल तपमान असते. निर्यातदारांचे प्रशिक्षित कर्मचारी खुडणीची कामे करतात. ३० कर्मचाऱ्यांचा समूह निर्धारित कालावधीत सुमारे १०० क्विंटल द्राक्षांची खुडणी करतात. १७ ते २२ एमएम आकारमान द्राक्षाचे असते. ९ किलो क्षमतेच्या प्लॅस्टिक कॅरेटमध्ये द्राक्ष ठेवण्यात येतात. या द्राक्षांची वाहतूक करून प्रिकूलिंग सेंटर स्टोरेज युनिटमध्ये पाठविण्यात येतात. तत्पूर्वी या द्राक्षांची पुन्हा प्रतवारी करण्यात येते. एकसारख्या आकारमानाची द्राक्षे आयात केलेल्या बॉक्समध्ये ७०० ग्रॅम वजनाची द्राक्षे विशिष्ट प्रकारच्या पारदर्शी कागदाच्या आवरणात ठेवण्यात येतात. राष्ट्रीयीकृत बँकेच्या धनादेशाच्या माध्यमातून खरेदी-विक्र ीचे व्यवहार पार पडतात. ७० ते १२० रु पये प्रती किलोचा दर प्रतवारी व दर्जा पाहून ठरविला जातो. दरम्यान, जयवंत देशमुख यांची द्राक्षे बांगलादेशात, बाळासाहेब घडवजे यांची द्राक्षे रशियाला तर आता सुधाकर घडवजे यांची द्राक्षे युनायटेड किंगडमला पोहोचल्याने वणीचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गेले. (वार्ताहर)