शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

आजी-माजी नगरसेवक अस्तित्वासाठी आमनेसामने

By admin | Updated: February 18, 2017 00:01 IST

आजी-माजी नगरसेवक अस्तित्वासाठी आमनेसामने

नाशिकरोड : चार गावठाण, मळे भाग, झोपडपट्टी परिसर, सोसायटी, असा भौगोलिकदृष्ट्या बनविलेल्या प्रभाग २२ मध्ये विजयाचे गणित सर्वच पक्षांना कठीण जाणार आहे. प्रभाव क्षेत्र आणि वैयक्तिक संबंध यावरच उमेदवार तरणार आहे.‘अ’ अनुसूचित गटातून शिवसेनेच्या माजी महापौर नयना घोलप, भाजपाकडून सरोज अहिरे, मनसे तानाजी सकट, कॉँग्रेस आघाडी सारीका कीर, अपक्ष जगदीश पवार, शिवसेना उपनेते बबन घोलप यांची नात्याने सून अपक्ष सुषमा रविकिरण घोलप, बहुजन विकास आघाडी अमोल घोडे, अपक्ष नितीन जगताप, प्रवीण लासुरे, किरण राक्षे हे निवडणूक रिंगणात आहेत. माजी आमदार घोलप व बाबूलाल अहिरे यांच्या मुली आमनेसामने आहेत.  ‘ब’ इतर मागासवर्ग महिला गटातून शिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख सत्यभामा गाडेकर, मनसे- पुष्पा विश्वनाथ रोकडे, भाजपा- दीपाली धनाजी कोठुळे, कॉँग्रेस आघाडी माजी नगरसेवक लंकाबाई हगवणे, अपक्ष- लता जाधव या निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर रोकडे यांनी शिवसेनेतून मनसेची वाट पकडली तर हगवणे यांनी या भागाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र सर्व पक्षीय उमेदवार, पक्षाची ताकद, वैयक्तिक नातेसंबंधावर विजयाला गवसणी घालण्याची पराकाष्ठा करत आहे.  क सर्वसाधारण महिला गटातून शिवसेना नगरसेवक सुनीता उत्तम कोठुळे, भाजपा गौरी शंकर साडे, राष्ट्रवादी आघाडी - स्नेहल चैतन्य देशमुख, अपक्ष प्रणाली विक्रम कोठुळे, नाजेरा अब्दुल सत्तार शेख या निवडणूक रिंगणात आहेत. नगरसेवक म्हणून केलेली कामे ही सुनीता कोठुळेंची जमेची बाजू आहे. मात्र विहितगावातुनच प्रणाली कोठुळ ेदेखील आहे, तर देवळालीगावातून राष्ट्रवादीच्या स्नेहल देशमुख व भाजपाच्या गौरी साडे आहेत. मनसेच्या कविता जाधव या पिंपळगावखांबच्या आहेत. प्रत्येकांची मदार आपापल्या परिसरावरच अवलंबून आहे.