शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली मॅच जिंकली
6
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
7
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
8
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
9
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
10
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
11
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
12
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
13
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
14
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
15
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
16
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
17
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
20
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video

ग्रामपंचायत करणार थकबाकीदारांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 12:42 IST

लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.

लोहोणेर : येथील ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असलेल्या घरपट्टी, पाणीपट्टी व जागाभाडे थकबाकीदारांना कडक कारवाई करण्याचा इशारा प्रशासनातर्फे देण्यात आला आहे.थकबाकीदाराना ग्रामपंचायतीच्यावतीने लोकन्यायालयाच्या मार्फत पाच ते सहा वेळा घरपोच नोटीसा देऊनही ज्या थकबाकीदारांनी थकबाकी अद्याप भरलेली नाही. अशा थकबाकीदारांनी येत्या १७ फेब्रुवारीपर्यत थकबाकी न भरल्यास १८ फेब्रुवारीपासून संबंधिताचें पिण्याच्या पाण्याचे नळ जोडण्या खंडित करण्यात येणार आहे. असे सरपंच जयवंता बच्छाव व ग्रामविकास अधिकारी यु. बी.खैरनार यांनी दिला आहे. याबाबत ग्रामपंचायतीने दिलेली माहिती अशी की, लोहोणेर ग्रामपंचायतीची ३१ मार्च २०१९ अखेर सुमारे १३,७५, ८५८ रु पये घरपट्टी व ५,५३,६१२ रु पये पाणीपट्टी थकबाकी आहे. सदरची घरपट्टी थकबाकी ही २०७ जणांकडे एक वषापेक्षा जास्त कालावधी पासून थकीत आहे. तर १७७ खातेदारांकडे एक वर्षाची थकीत बाकी येणे आहे. या थकीत येणे बाकी वसुलीसंदर्भात नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत चर्चा होऊन वसुली बाबत ठोस पावले उचलणे गरजेचे आहे असा ठराव अर्जुन लाला शेवाळे यांनी सूचक म्हणून मांडला. त्यास माजी सरपंच अशोक अलई यांनी अनुमोदन दिले. ग्रामपंचायतीच्या मार्फत होणाऱ्या लिलावात सहभागी झालेल्या लिलाव धारकाकडे ३१ मार्च २०१९ पर्यत सुमारे १३,९३,६०० रु पये थकबाकी आहे. या थकबाकी संदर्भात ग्रामपंचायतीच्या वतीने लाऊड स्पिकर लावून गावात आवाहन करण्यात येणार आहे. तसेच सदरची थकबाकी ग्रामपंचायतीकडे जमा न केल्यास थकबाकीदाराची नांवे डिजिटल बोर्डावर झळकविण्यात येणार आहेत. ज्या थकबाकीदाराकडे ग्रामपंचायतीची घरपट्टी, नळपट्टी अथवा जगाभाडे थकीत आहे अशा थकबाकीदारांनी येत्या १७ तारखेच्या आत आपली थकबाकी ग्रामपंचायत कार्यालयात येऊन भरून द्यावी अन्यथा अशा थकबाकीदाराचे नळ जोडण्या खंडित करण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला असून या बाबत कडक कारवाई करण्यात येणार आहे. असे आवाहन करण्यात आले आहे.------------------------------------लोहोणेर ग्रामपंचायतीच्या थकबाकीदारामध्ये वसंत दादा पाटील सहकारी साखर कारखान्याकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकी असून वसाकाकडे १५,१९,२४८ रु पये मागील थकबाकी व ११,६१, ३१३ रु पये चालू थकबाकी अशी एकूण २६,८०, ५६१ रु पये सन २०१९-२० पर्यत थकीत रक्कम आहे. तर ग्रामपंचायतीचे ७६,७७० रु पये जागा भाडेही संबंधितांकडे थकीत आहे

टॅग्स :Nashikनाशिक