शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी कार्यालयांमध्ये मोफत विधी सेवेचे नामफलक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2017 01:13 IST

आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा दिली जाते़; मात्र ९० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ असल्याने आता प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये नामफलक लावले जाणार असल्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले़

नाशिक : आर्थिक वा अन्य कोणत्याही कारणांमुळे न्यायापासून कोणताही घटक वंचित राहू नये यासाठी विधी सेवा अधिनियम मंजूर करण्यात आला़ यानुसार अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºयांना जिल्हा न्यायालयातील जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत मोफत विधी सेवा दिली जाते़; मात्र ९० टक्के नागरिक याबाबत अनभिज्ञ असल्याने आता प्रत्येक सरकारी कार्यालयांमध्ये नामफलक लावले जाणार असल्याचे प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी सांगितले़जिल्हा विधी सेवा प्राधिकरणतर्फे देण्यात येणाºया मोफत विधी सेवांबाबत नागरिकांना माहिती व्हावी यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये फलक लावले जाणार आहेत़ शहर पोलीस आयुक्तालयात शुक्रवारी (दि़ १८) शिंदे यांच्या हस्ते नामफलक लावण्यात आला़ यावेळी त्यांनी सांगितले की, अनुसूचित जाती-जमाती, महिला, अपंग, ज्येष्ठ नागरिक तसेच दोन लाख रुपये वार्षिक उत्पन्न असणाºया नागरिकांना कौटुंबिक वाद वा दिवाणी स्वरूपाच्या दाव्यांसाठी विधी सेवा प्राधिकरणमार्फत कायदेशीर सल्ला व मोफत वकीलही दिला जात असल्याचे सांगितले़ सरकारी कार्यालयांमध्ये लावण्यात येणाºया या नामफलकावर कायदेशीर सल्ला व मदतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचा संपर्क क्रमांक, पत्ता तसेच ई-मेल अ‍ॅड्रेसही टाकण्यात आला आहे़ तसेच नागरिकांनी विधी सेवा प्राधिकरण कार्यालयात माहितीसाठी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ यावेळी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे आदींसह पोलीस अधिकारी उपस्थित होते़