शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

शासनाचा निषेध : शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप;

By admin | Updated: December 21, 2014 23:00 IST

कर्जमाफीची मागणीदिंडोरीत राष्ट्रवादीचा रास्ता रोको

 दिंडोरी : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी बेमोसमी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचा पाहणी दौरा करून शेतकऱ्यांना चांगली मदत देऊ असे आश्वासन दिले; परंतु तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसत त्यांच्या जखमेवर मीठ चोळले, असला आरोप करीत दिंडोरी तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसने दिंडोरी येथे रास्ता रोको करत युती सरकारचा निषेध केला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे.राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस कार्यकर्त्यांनी दिंडोरी येथे पालखेड चौफुलीवर नुकसानीमुळे खराब झालेली द्राक्षे रस्त्यावर ओतत आंदोलन केले . यावेळी जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रकाश वडजे यांनी युती सरकारवर हल्लाबोल करत मोदी शासन आल्यापासून शेतकरी नाडला जात असून, कांदा, टमाटे, सोयाबीन, मका, दूध, साखर अशा सर्वच शेतमालाचे भाव कमी ठेवण्याचे काम करत शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले . आता महाराष्ट्रात एवढे नुकसान होऊनही तुटपुंजी मदत देत शासनाने शेतकऱ्यांची थट्टा केली आहे. सरकारने तत्काळ संपूर्ण कर्जमाफी द्यावी व पुढील हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला . यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर भगरे, रायुकॉँ तालुकाध्यक्ष राजेंद्र उफाडे, गंगाधर निखाडे आदिंची भाषणे झाली. यानंतर नायब तहसीलदार मोहन कनोजे यांना निवेदन देण्यात आले. सुमारे अर्धा तास चाललेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प होऊन विस्कळीत झाली. यावेळी बाजार समितीचे उपसभापती अनिल देशमुख, माजी तालुकाध्यक्ष सचिन देशमुख, राजेंद्र ढगे, कैलाश मवाळ, नरेंद्र पेलमहाले, श्याम हिरे, परिक्षित देशमुख, बाजार समितीचे संचालक वसंतराव जाधव, रघुनाथ पाटील आदि उपस्थित होते. पोलीस निरीक्षक संजय शुक्ला यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वार्ताहर)