शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकरोड नाट्यगृहाला शासनाचे अनुदान मंजूर

By admin | Updated: October 30, 2016 00:44 IST

बैठक : २० कोटींच्या कामांना हिरवा कंदील

नाशिक : प्राथमिक सोयी-सुविधांच्या विकासकामांसाठी राज्य शासनाकडून महापालिकेला देण्यात येणाऱ्या विशेष अनुदानांतर्गत प्रस्तावांना विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. त्यात प्रामुख्याने नाशिकरोडच्या नाट्यगृहासह शिखरेवाडी येथे क्रीडांगण, दसक येथे स्केटिंग ग्राउंड व जॉगिंग ट्रॅक या कामांचा समावेश असून, सुमारे २० कोटी रुपये खर्चाच्या या कामांसाठी पहिल्या टप्प्यात तीन कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.  राज्य शासनामार्फत सार्वजनिक स्वरूपाच्या विकासकामांसाठी महापालिकेला विशेष अनुदान दिले जाते. त्यात महापालिका व शासन यांचा प्रत्येकी ५० टक्के हिस्सा असतो. महापालिकेने सदर कामांमध्ये नाशिकरोड येथे देवळाली शिवारात स. नं. ११७ (पै) मध्ये १७ कोटी ९८ लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव सादर केला होता. याशिवाय, नाशिकरोड विभागातच प्रभाग क्रमांक ५६ मध्ये शिखरेवाडी येथे स.नं. ११२ मध्ये क्रीडांगण विकसित करण्यासाठी एक कोटी ९९ लाख रुपये, तर नाशिकरोड विभागातीलच प्रभाग क्रमांक ३२ मधील स.नं. ६८ (पै) येथे दसकमध्ये स्केटिंग ग्राउंड व कम्पाउंड तसेच दसक येथे जॉगिंग ट्रॅक उभारणीचा प्रस्तावांचाही समावेश होता.  बैठकीला मनपाचे आयुक्त अभिषेक कृष्ण, अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण, शहर अभियंता सुनील खुने आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)आणखी अनुदानाची मागणीशासनाने नाट्यगृह उभारणीसाठी पाच कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिलेली आहे, परंतु सदरचे काम पाच कोटी रकमेत होणे शक्य नसल्याने महापालिकेने आणखी ६.५० कोटीचे अनुदान प्राप्त होण्यासाठी मागणी केली होती. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन सदर प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. यावेळी नाट्यगृहासाठी २.५० कोटी, क्रीडांगणासाठी एक कोटी, तर दसक येथे स्केटिंग ग्राउंड व जॉगिंग ट्रॅकसाठी ३५ लाख याप्रमाणे एकूण तीन कोटी ८५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर केले.