शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

पूरग्रस्तांना मदत देण्यास सरकार अपयशी

By admin | Updated: August 14, 2016 02:34 IST

माणिकराव ठाकरे : तातडीने मदतीच्या सरकारला सूचना करणार

नाशिक : नाशिकसह राज्यभरात पूरस्थितीमुळे नुकसान झालेल्या नागरिकांना आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यास सरकार अपयशी ठरत असून, आपण सरकारला या नुकसानग्रस्त भागाला तातडीने मदत करण्याच्या सूचना करणार आहोत, अशी माहिती विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी (दि. १३) गोदाकाठी असलेल्या चांदोरी, सायखेडा, करंजगाव, चापडगाव या ग्रामीण भागाचा, तसेच शहरातील पंचवटी अमरधाम, सराफबाजार, कापडबाजार, एरंडवाडी आदि भागांचा दौरा करून गोदावरीच्या पूरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. ग्रामीण भागात गोदाकाठच्या जवळपास ३५ ते ४० गावांचे पुरामुळे नुकसान झाल्याचे त्यांनी सांगितले. यात घरांची पडझड, उसाच्या पिकाचे नुकसान यांसह अन्य बाबतीत झालेल्या नुकसानीचे अद्याप पंचनामे झालेले नाही. सरकार १० दिवस उलटले तरी पोहोचू शकलेले नाही. आपण स्थानिक तहसीलदार व कृषी अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त शेतीचे व मालमत्तेचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.पंचनाम्यांचा अहवाल आल्यावर आपण सरकारकडे नुकसान भरपाईसाठी तातडीने देण्यासाठी सांगणार आहोेत. शहरातही गोदाकाठच्या परिसरात प्रचंड नुकसान झाले आहे. सराफबाजार, कापडबाजारात पाणी शिरल्यामुळे २००८ साली जशी नुकसानभरपाई मिळाली होती, तशी भरपाई आता देण्याची संबंधितांनी आपल्याकडे मागणी केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. यावेळी कॉँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, संजय चौपाणे, शहराध्यक्ष शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, शाहू खैरे, उद्धव पवार, सुरेश मारू, बबलू खैरे, गुलाम शेख, सुनील आव्हाड, स्वप्नील पाटील, नरेश पाटील आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)