शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

गावगाड्याचा कारभार : तोडफोडीचे राजकारण; अनेकांचे गुडघ्याला बाशिंंग

By admin | Updated: December 3, 2014 23:14 IST

सरपंचपदासाठी हालचाली गतिमान

बागलाण : तालुक्यातील तेहतीस ग्रामपंचायतींच्या २८५ जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली. आता याच ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुकांच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. गावगाड्याची सूत्रे ताब्यात घेण्यासाठी इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी केली असून, अनेक ठिकाणी बहुमतासाठी तोडफोडीचे राजकारण आहे तर बिगर आदिवासी क्षेत्रातील बहुतांश सरपंचपद राखीव असल्यामुळे ‘दुधावरची तहान, ताकावर भागविण्यासाठी’ इच्छुकांनी उपसरपंच पदासाठी व्यूहरचना आखल्याने ऐन थंडीत ग्रामीण भागातील राजकारण तापू लागले आहे.तालुक्यातील अजमीर सौंदाणे, नांदिन, भडाणे, खामलोन, पारनेर, वायगाव, नवे निरपूर, पिंगळवाडे, फोफीर, जुने निरपूर, सुराणे येथील सरपंचपदाच्या लढती लक्षवेधी आणि चुरशीच्या होणार आहेत. अजमीर सौंदाणे येथील सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव आहे. या पदासाठी सोसायटीचे सभापती मंगेश पवार यांच्या मातोश्री सुभद्रा पवार, ऊर्मिला पवार, जिजाबाई कुवर, अंजना गवळी या चौघींमध्ये रस्सीखेच आहे. बहुमतासाठी तोडफोडीच्या राजकारणात कोण यशस्वी होते यावरच विजयाचे गणित अवलंबून आहे. पिंगळवाडे येथे कृष्णा भामरे यांच्या पॅनलने बाजी मारली. मात्र सरपंचपद खुले असल्यामुळे या पदासाठी विठ्ठल भामरे, भाऊसाहेब भामरे, शांताराम भामरे या तिघांमध्ये रस्सीखेच असल्यामुळे ऐनवेळी पॅनलच्या सूत्रधारापुढे पेच निर्माण होऊ शकतो. फोफीर येथील सरपंचपद महिलांसाठी खुले असून, या पदासाठी राजसबाई भामरे, भागाबाई भामरे हे दोघे दावेदार मानले जात आहेत. भाऊबंदकी कोणाला टेकू देते यावरच दोघांचे भवितव्य अवलंबून आहे. नवे निरपूर ही महिलांसाठी खुले आहे या पदासाठी संगीता सूर्यवंशी, वैशाली सूर्यवंशी या दोघांमध्ये जुंपण्याची शक्यता असून, आदिवसी सदस्य कुणाच्या पारड्यात वजन टाकतात त्यावरच जय पराजय अवलंबून आहे. वायगाव येथे अशोक अहिरे, भारत अहिरे यांची सर्व जागा हस्तगत केल्या असल्या तरी या पदासाठी कल्पना अहिरे, सरस्वती अहिरे आणि तनुजा अहिरे या इच्छुकांची संख्या पाहता येथील चित्र बदलू शकते. खामलोन येथील सरपंचपद महिलांसाठी खुले असून, सत्तेच्या किल्ल्या ताब्यात घेण्यासाठी प्रमिला धोंडगे, अर्चना पाटील, बेबी धोंडगे या सरसावल्या आहेत येथील वाडा परंपरा कुणाला तारते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पारनेर येथील सरपंचपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. अंजना देवरे या एकमेव ओबीसी सदस्य असून त्याच सरपंचपदी विराजमान होतील. भडाणे येथे सरपंचपद खुले असले तरी महिलाराज अपेक्षित आहे. (वार्ताहर)