शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

GOOD NEWS: कामगाराच्या मुलाला फेसबुककडून 10 हजार डॉलरचे बक्षीस

By admin | Updated: May 15, 2017 16:49 IST

कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे

 

ऑनलाइन लोकमत/ रामदास शिंदे
पेठ (नाशिक), दि. 15 –कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर सामान्य कुटुंबातील विद्यार्थीही असामान्य कर्तृत्व सिद्ध करू शकतात याचेच ज्वलंत उदाहरण नाशिक येथील जयेश अहिरे सध्या जगभर गाजत असून कंपनीत काम करणाऱ्या कामगाराचा मुलगा जयेशला फेसबुकने तब्बल 10 हजार डॉलरचे बक्षीस प्रदान केले आहे.
फेसबुक सह इतर सर्वच सोशल मीडिया साइटमध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी असतात. यामुळे वापर करणाऱ्या खातेदारांचा डाटा असुरक्षित होऊ शकतो. अशाच प्रकारची फेसबुकमध्ये त्रुटी राहुन गेल्याचे नाशिकच्या व सध्या पुणे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या जयेश बापू आहिरे या विद्यार्थाने शोधून काढली.
एखाद्याने फेसबुकवर अपलोड केलेला एखादा फोटो वापर करणाऱ्याची परवानगी न घेता दुसऱ्याला बदलता किंवा काढून टाकता येऊ शकत होता. अशा प्रकारची त्रुटी शोधून काढल्यानंतर जयेशने ईमेलद्वारे फेसबुकला ही बाब निदर्शनास आणून दिली. प्रारंभी जयेशचे म्हणणे फारसे कंपनीने मनावर न घेतल्याने त्याने फेसबुकच्या टेस्टिंग प्रोफाईलमध्ये बदल करून त्याचा सविस्तर छायाचित्रण कंपनीला सादर केले.  त्यामुळे खडबडून जागे झालेल्या फेसबुकने जयेशशी संपर्क साधून सदर त्रुटीबाबत आधिक माहिती जाणून घेतली.
कंपनीला खात्री पटल्यानंतर जयेशला तब्बल 10 हजार डॉलर म्हणजेच 6 लक्ष 50 हजाराचे बक्षीस दिले. जयेशचे वडील बापू सुकदेव अहिरे हे नाशिकच्या एका खासगी कंपनीत कामगार असून आई विद्या शिवणकाम करून मुलांचे शिक्षण व कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावतात. जयेश सद्या सिंहगड महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जयशने आपले शिक्षण घेतले असून अतिशय कमी वयात मिळालेल्या या बक्षिसाचे श्रेय तो आपल्या आई - वडिलांना देतो.
तेव्हा फेसबुकला विश्वास झाला - जयेश
मी कायमच आपल्या दैनंदिन वापरातल्या साइट्स जशा गुगल किवा फेसबुकविषयी खूपच जिज्ञासू राहिलोय. या साइट्समध्ये कुठे न कुठे बग असतोच म्हणून मी नेहमी त्या टेस्ट करत असतो.
मी एका रात्री पूर्ण टेस्टिंग करून त्यांना बग रिपोर्ट केला पण त्यांनी माझं ऐकलंच नाही आणि ते सरळ म्हणाले की, असं काही असूच शकत नाही. पण जेव्हा मी त्यांना टेस्टिंग अकाउंटवरील त्यांची पोस्ट बदलून आणि या संपूर्ण अकार्यक्षमतेचा व्हिडीओ  पाठवला तेव्हा त्यांना विश्वास पटला. दरम्यान, मी स्वतः तो बग फिक्स करून दिला जेणेकरून युजर्संना त्रास होणार नाही.
काही तासात सर्व समस्या सुटल्यानंतर मला त्यांचा ईमेल आला आणि बग शोधल्याबाबत त्यांनी मला तब्बल 10 हजार डॉलर्स देऊ केले. 
"जयेश लहानपणापासूनच हुशार"
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने रोजगाराच्या शोधात गाव सोडून नाशिक गाठले. मिळेल ते कामे करत असताना एका कंपनीत नोकरी करून मुलांचे शिक्षण सुरू केले. जयेश लहानपणापासूनच हुशार असल्याने त्याला लागेल ती मदत पुरवण्याचा थोडाफार प्रयत्न केला मात्र जयेशने स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळवलेल्या बक्षिसामुळे आम्हास त्याचा अभिमान वाटतो.-  बापू आहिरे, जयेशचे वडील