शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
4
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
5
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
6
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
7
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
8
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
9
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
10
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
11
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
12
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
13
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
14
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
15
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
16
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
17
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
18
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
19
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
Daily Top 2Weekly Top 5

चांगली ग्राहकसेवा हे व्यवसायाच्या वाढीमागील गमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्यास ते संतुष्ट राहतात. यामधूनच या ग्राहकांकडून पुन्हा मिळणारी ऑर्डर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नाशिक : ग्राहकांना चांगली सेवा मिळत असल्यास ते संतुष्ट राहतात. यामधूनच या ग्राहकांकडून पुन्हा मिळणारी ऑर्डर वा त्यांच्यामार्फत मिळणाऱ्या नवीन ग्राहकांमुळे व्यवसायाची वृद्धी होते. व्यवसायाच्या चांगल्या वाढीमागे ग्राहकांना समाधान देणारी सेवाच प्रमुख असते, असे मत शहरातील विविध क्षेत्रामधील कार्यरत व्यावसायिकांनी व्यक्त केले आहे.

नाशिक ‘लोकमत’च्या रौप्यमहोत्सवी वर्धापनदिनानिमित्ताने आयोजित संवाद कार्यक्रमामध्ये नाशिकमधील अनेक प्रथितयश व्यावसायिकांनी वरील मत व्यक्त केले. या चर्चेमध्ये साची होंडाचे संचालक दिनेश वराडे, कांचनपुष्प जेम्स ॲण्ड डायमंडसचे संचालक दिनेश धोका, कार मॉलचे संचालक कपिल नारंग, ब्रिजमोहन टूर्सचे संचालक ब्रिजमोहन चौधरी, साधना मिसळचे संचालक राजन आमले आणि सुला विनियार्डस‌्चे वरिष्ठ उपाध्यक्ष मोनित ढवळे यांनी सहभाग घेतला. ‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी व सहायक उपाध्यक्ष बी.बी, चांडक यांनी या मान्यवरांशी संवाद साधला.

ग्राहकसेवा ही कोणत्याही व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाची असते. कोरोना साथीच्या काळामध्ये याचा प्रत्यय आला. या साथीने परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी आपल्याला तयार केले. या काळामध्ये झालेल्या व्यावसायिक चौकशा या ग्राहकांनी दिलेल्या चांगल्या माहितीमुळेच झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले. निर्बंधांच्या काळातही ग्राहकांना ज्या सेवा देणे शक्य होते, त्या दिल्याचेही त्यांनी सांगितले. निर्बंध हटविल्यानंतर गाडीच्या सर्व्हिसिंगसाठी लागलेल्या रांगा ही ग्राहकांच्या विश्वासाची पावती असल्याचे मत दिनेश वराडे यांनी मांडले. ग्राहकाला देव मानून त्याला संतुष्ट करण्यासाठी आपला व आपल्या कर्मचाऱ्यांचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राजन आमले यांनी केले.

आजचा जमाना ऑनलाइनचा असल्याने केवळ आपल्या शहरातूनच नाही तर अनेक ठिकाणांहून ग्राहकांमार्फत चौकशी होत असल्याची बाब कपिल नारंग यांनी स्पष्ट केली. ऑनलाइनच्या जमान्यातही आपण आपले शहर, त्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्यांचा प्रसार मोठ्या प्रमाणात करण्याची गरज ब्रिजमोहन चौधरी यांनी अधोरेखित केली. हिरे आणि रत्नांची खरेदी करण्यापूर्वी त्याबाबत पुरेशी माहिती देण्याकडे व ग्राहकांना शिक्षित करण्याचा आपला प्रयत्न असल्याचे दिनेश धोका यांनी सांगितले.

----------------

पर्यटन आणि हॉटेल उद्योगाला चांगले दिवस

काेरोनाचा सर्वाधिक फटका पर्यटन आणि हॉटेल या दोन उद्योगांना बसला आहे. मात्र आगामी काळामध्ये या दोन्ही उद्योगांना चांगले दिवस येण्याचे संकेत मिळत असल्याचे मत मोनित ढवळे यांनी व्यक्त केले. गेली दोन वर्षे लोक अडकून पडलेले असल्याने आता निर्बंध कमी होताच ते जवळच्या ठिकाणची पिकनिक करीत आहेत. त्यामुळे हॉटेल तसेच रिसॉर्टना लाभ मिळत असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.