शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

गोदा पाय ठेवण्यायोग्य नाही, स्नान कसे करू?

By admin | Updated: January 13, 2015 00:34 IST

श्री श्री रविशंकर : ‘वेणुनाद’ कार्यक्रमात सवाल; आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक करणार स्वच्छता

नाशिक : प्रदूषणामुळे गोदावरी पाय ठेवण्यायोग्य राहिलेली नसताना, त्यात स्नान करण्याचा विचार कसा करू, असा सवाल आर्ट आॅफ लिव्हिंगचे प्रणेते तथा आध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी उपस्थित केला. आठ महिन्यांत मंगळावर पोहोचता येते, तर नद्यांची स्वच्छता होऊ शकत नाही का, असे विचारत त्यांनी लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन व नागरिकांना नद्यांची तातडीने स्वच्छ करण्याचे आवाहन केले. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवक या कार्यात पुढाकार घेणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. आर्ट आॅफ लिव्हिंग परिवाराच्या वतीने पंचवटीतील साधुग्राम मैदानावर विश्वविक्रमी ‘वेणुनाद’ या कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. ते म्हणाले, बासरीत कचरा असेल, तर ती नीट वाजत नाही. नाशकातील कुंभमेळा आठ महिन्यांवर आला असताना, गोदावरी, कपिला व नासर्डी या तिन्ही नद्या प्रचंड प्रदूषित झाल्या आहेत. नासर्डीचा तर अक्षरश: नालाच झाला आहे. शहर व जिल्ह्यातील खासदार, आमदार, महापौर व महापालिका प्रशासनाने पुढाकार घेऊन आपत्कालीन स्थितीच्या वेगाने या नद्यांची स्वच्छता मोहीम राबवावी. आर्ट आॅफ लिव्हिंगचे स्वयंसेवकही यात पुढाकार घेतील. प्रशासनाने गोदावरीला मिळणारे सगळे नाले एकतर बंद करावेत किंवा पाइपच्या सहाय्याने ते अन्यत्र वळवावेत. या नद्या स्वच्छ झाल्या, तरच कुंभमेळ्यात साधू-महंत नदीत स्नान करू शकतील. लोकप्रतिनिधींनी तपश्चर्या समजून हे कार्य सिद्धीस न्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली. यावेळी त्यांनी जलस्वच्छतेचे महत्त्व विशद केले. ते म्हणाले, जलस्रोत स्वच्छ झाल्यास माणसांचे आरोग्य चांगले राहते, विचारही स्वच्छ होतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत’ मोहिमेला प्रतिसाद देण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच रसायनमुक्त शेती करा, प्लास्टिक जाळू नका, त्यातून कॅन्सरसारखे रोग उद्भवतात, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाला आमदार तथा माजी मंत्री छगन भुजबळ, आमदार बाळासाहेब सानप, आमदार पंकज भुजबळ, नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरुमित बग्गा, माजी खासदार समीर भुजबळ, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)